Bharat Review : 'भारत' म्हणजे, 'SMASH-HIT; सोशल मीडियावर बोलबाला

टीम ईसकाळ
बुधवार, 5 जून 2019

सलमान खानचा 'भारत' आज 'रमजान ईद'च्यानिमित्ताने सगळीकडे प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस सलमानचे चाहते 'भारत'ची आतुरतेने वाट पाहात होते. काही चाहत्यांनी तर फर्स्ट डे फर्स्ट शो एका आठवड्यापूर्वीच बुक केले. सर्वात कळस म्हणजे नाशिकमध्ये एका आशिष सिंघल नावाच्या चाहत्याने तर संपूर्ण थिएटर बुक केले आहे. चित्रपटाला जाण्यापूर्वी त्याने मोठी मिरवणूकही काढली. 

सोशल मीडियावरही 'भारत'ला संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही जणांनी भारतला चार-साडेचार स्टार दिले, तर काहींनी 'भारत'बद्दल नाराजी व्यक्त केली. ट्युबलाईट व रेस 3 च्या अपयशानंतर सलमान आता वेगळ्या धाटणीचा 'भारत' घेऊन आलाय. कतरिना कैफ ही सलमानसह मुख्य भूमिकेत दिसेल. तर तब्बू, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही भारतमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर भारतचे दिग्दर्शन अली अब्बास जफ़र यांनी केले आहे.  

ट्रेड अॅनॅलिस्ट तरन आदर्श यांनी भारतचे 'SMASH-HIT' असे एका शब्दांत वर्णन केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tweeter reaction on Bharat movie of Salman Khan