Twinkle Khanna : 'कोहिनूर' सोबत आमचे आणखी 'दोन हिरे' परत करा! ट्विकंल कुणाबद्दल बोलली?

तिनं इंग्लंडनं आम्हाला आमचा कोहिनूर हिरा परत करावा असे म्हटले आहे. मात्र यासोबतच आणखी दोन हिरेही आम्हाला आमचे द्यावेत अशी मागणी तिनं केली होती.
Twinkle Khanna Reaction
Twinkle Khanna Reaction esakal

Twinkle Khanna ask United Kingdom UK to return Kohinoor : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी एवढीच काही ट्विंकल खन्नाची ओळख नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ती बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. ट्विंकलच्या अभिनयापेक्षा तिच्या दिसण्याला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली. त्यामध्ये अजय देवगणसोबत केलेला जान, आमिर खान सोबतचा मेला आणि शाहरुख सोबतचा बादशहा. या चित्रपटांनी ट्विंकलला प्रसिद्धीच्या झोतात आणले.

सोशल मीडियावर ट्विंकल ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. ती आता चांगली लेखिका देखील झाली आहे. देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये तिनं केलेलं लेखन वाचकांचे लक्ष वेधून घेते. ट्विंकलची आतापर्यत दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तिच्या ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. इंस्टा, ट्विटरवर ती नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ट्विंकलनं केलेली राजकीय विधानं ही अनेकदा तिला अडचणीत आणणारी ठरली आहेत. त्यामुळे अक्षयला देखील त्यावरुन खुलासा करावा लागला होता. आताही तिनं केलेलं कोहिनूर हिऱ्यासंबंधीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यामध्ये तिनं इंग्लंडनं आम्हाला आमचा कोहिनूर हिरा परत करावा असे म्हटले आहे. मात्र यासोबतच आणखी दोन हिरेही आम्हाला आमचे द्यावेत अशी मागणी तिनं केली होती. आता ते दोन हिरे हे वक्तव्य दोन व्यक्तींसंबधित आहेत. त्यावरुन ट्विंकल चर्चेत आली आहे.

Twinkle Khanna Reaction
Adah Sharma Accident : केरळ स्टोरीच्या अदा शर्माचा अपघात

ट्विंकलनं कोहिनूर हिऱ्यासोबत ललित मोदी आणि विजय माल्ल्या यांनाही ब्रिटननं आम्हाला देऊन टाकावेत. त्याची आम्हाला गरज आहे. काही दिवसांपूर्वी युनायटेड किंग्डमचे राजे म्हणून चार्ल्स ३ यांचा राज्यभिषेक करण्यात आला. त्यावेळी अभिनेत्रीनं केलेलं ट्विट चर्चेत आलं होतं. तिनं चार्ल्स यांच्या शिरपेचात जो मुकूट आहे त्यामध्ये कोहिनूर हिरा नाही. अशी बोचरी टीका तिनं केली होती.

Twinkle Khanna Reaction
'The Kerala Story' ब्रिटिशांना का खटकला?,यूके मध्ये आयत्यावेळी प्रदर्शनावर बंदी

कोहिनूर हा आमच्या देशाचा हिरा आहे त्याला परत करा. असे म्हणताना अभिनेत्रीनं आणखी दोन जे अनमोल हिरे आहेत ज्यांची देशाला गरज आहे त्या मोदी आणि माल्ल्या यांनाही परत करण्यास सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com