अंडरटेकर सिरियस झाला, बॉलीवूडच्या खिलाडीची तंतरली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

undertaker and akshay kumar

अंडरटेकर सिरियस झाला, बॉलीवूडच्या खिलाडीची तंतरली...

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (bollywood khiladi akshay kumar) हा त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. कोरोनाच्या काळातही त्यानं आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. येत्या काळात त्याचा बेल बॉटम (bell bottom) नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्याला WWF च्या प्रसिध्द पैलवान अंडरटेकरनं (undertaker) त्याला कुस्तीचं आव्हान दिलं आहे. आणि अक्षयनं त्यावर एक गंमतीशीर कमेंट दिली आहे. ( undertaker challenged akshay kumar to a real match khiladi actor reply is winning the internet )

त्याचं झालं असं, अक्षयच्या खिलाडीयों का खिलाडी (film khiladiyo ka khiladi) या चित्रपटाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानं यानिमित्तानं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यात त्यानं चित्रपटामध्ये मी ख-या अंडरटेकर बरोबर फाईट केली नव्हती. आता त्याला ख-या अंडरटेकरनं फाईट करण्याचे आव्हान दिलं आहे. अक्षयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या दोन्ही सेलिब्रेटीच्या फॅन्सनं त्या पोस्टला पसंती दर्शवली आहे.

खिलाडीयोंका खिलाडीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अक्षयनं एक मीम्स व्हायरल केलं होतं. त्यात लिहिलं होतं, तुम्ही जर अंडरटेकरला हरवलं असेल तर हात वर करा. त्यावेळी तीन पैलवानांबरोबर अक्षयनं आपला फोटो शेअर केला होता. तेव्हा आपण ख-याखु-या अंडरटेकरशी फाईट केली नव्हती. असं त्यानं सांगितलं होतं.

हेही वाचा: मी आता अनाथ झालोय, शेखर सुमन यांना मातृशोक

अक्षयची ही पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. अक्षयनं लिहिलंय, हो मी तुझ्या आव्हानाचा स्वीकार करतो. तु आता ख-या मॅचसाठी तयार आहेस का, पण मला पहिल्यांदा माझा इन्शुरन्स तर काढू दे. त्यानंतर मी तुला सांगतो. अक्षयच्या या उत्तरानं त्याच्या चाहत्यांची चांगलीच करमणूक झाली आहे.

टॅग्स :Bollywood News