..त्याआधीच घेतला जगाचा निरोप; बोनी कपूर यांच्या पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग | Boney Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boney kapoor, sridevi, mona

..त्याआधीच घेतला जगाचा निरोप; बोनी कपूर यांच्या पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अप्रतिम सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी Sridevi यांचं फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईत निधन झालं. एका लग्नसमारंभासाठी त्या पती बोनी कपूर Boney Kapoor आणि मुलगी खुशीसोबत दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी आणि बोनी यांची मुलगी जान्हवी ही त्यावेळी तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने दुबईला जाऊ शकली नव्हती. श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. मात्र या निधनानंतर बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग समोर आला.

बोनी कपूर यांची पहिली पत्नी, अभिनेता अर्जुन कपूरची आई मोना शौरी-कपूर यांचं वयाच्या ४८व्या वर्षी निधन झालं. मोना आणि श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भातील एक दुर्दैवी योगायोग आढळून आला. ज्यावेळी मोना यांचं निधन झालं, त्यावेळी अर्जुन त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाची तयारी करत होता. मुलाचा पहिला चित्रपट पाहण्याआधीच मोना यांनी जगाचा निरोप घेतला. तर श्रीदेवी यांचंसुद्धा जान्हवीचा पहिला चित्रपट पाहण्याआधीच निधन झालं. बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींना त्यांच्या मुलांच्या करिअरमधला पहिला चित्रपट पाहता आला नाही.

हेही वाचा: हार्दिक जोशी ते सायली संजीव.. दिवाळीनिमित्त मराठी कलाकारांची 'कार' खरेदी

अर्जुन कपूरने २०१२ मध्ये 'इशकजादे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता. त्याआधी मार्च महिन्यात मोना यांचं निधन झालं. तर दुसरीकडे जान्हवी कपूरचा 'धडक' हा पहिला चित्रपट जुलै २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्याआधी फेब्रुवारीमध्ये श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर मुलीच्या चित्रपटाचा पोस्टर 'पीन' करून ठेवला होता.

loading image
go to top