
Pandit Jasraj: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या तिकीटांचे प्रकाशन केले. पंडित जसराज यांच्या संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ एक तिकीट जारी केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
शास्त्रीय संगीत प्रत्येक घराघरात पोहोचवणारे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले होते. पंडित जसराज आज भौतिकदृष्ट्या आपल्यात नसतील, पण त्यांचा आवाज आणि त्यांचे अस्तित्व कायम राहील.
भारतातच नाही तर जगभरात पंडित जसराज यांची ख्याती आहे. पुण्यातील सवई गंधर्व महोत्सवात देखील त्यांनी सादरीकरण केले होते.
पंडित जसराज हे भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराज यांना गौरविले होते. (Latest Marathi News)
शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे.अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर त्यांनी शास्त्रीय गायकाने सादरीकरण केले होते. यासह सातही खंडांमध्ये कार्यक्रम सादर करणारे ते पहिले भारतीय होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.