नोरा फतेही कधीकाळी विकायची लॉटरी, आता आहे बॉलिवूडची डान्स क्वीन

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

बॉलिवूडमध्ये अनेक डान्सर आहेत पण, सर्वांना मागे टाकणारी क्वीन म्हणजे नोरा फतेही. नोरा बी-टाऊनची आता टॉपची डान्सर आहे. पण, बॉलिवूडमध्ये येण्याआधी नोराचा प्रवास कसा होता हे जाणून घ्या.

मुंबई : बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं इतकही सोप्पं नाही. बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळालीच तरी कलाकारांच्या शर्यतीत टिकून राहणेही अवघड आहे. सेलिब्रिटींची मुलं म्हणजे स्टार किड्स तर सिनेमांमध्ये येतातच. पण, अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अनेकांनी मेहनतीने आणि कष्ट करुन बी-टाऊऩमध्ये आपलं नाव कमावलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक डान्सर आहेत पण, सर्वांना मागे टाकणारी क्वीन म्हणजे नोरा फतेही. नोरा बी-टाऊनची आता टॉपची डान्सर आहे. पण, बॉलिवूडमध्ये येण्याआधी नोराचा प्रवास कसा होता हे जाणून घ्या.

कल्कीने पाऊलखुणांनी केलं छोट्या मुलीचं स्वागत, ठेवलं 'हे' अनोखं नाव !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to this cutie pie 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

'बिग बॉस' च्या सिझन 9  या सुप्रसिद्ध शोमधून नोरा झळकली होती. त्यानंतर तिला अधिक लोकप्रियता मिळाली. 'दिलबर-दिलबर' आणि 'साकी' या गाण्यांमध्ये तिने केलेल्या नृत्याने तिचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचलं. या गाण्यांमधील तिच्या परफॉर्मन्सने सर्वांनाच वेड लावले. गायक हार्डी संधू याच्या 'क्या बात है' या म्युझिक अ‍ॅल्बमद्वारे तिला विशेष ओळख मिळली आहे. लाखो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये येणाऱ्यापूर्वी प्रचंड संघर्ष केला आहे. 

नोरा मोरक्कन-कनाडाई डांसर, मॉडल आणि अभिनेत्री आहे.  सत्यमेव जयते' सिनेमाद्वारे तिने बॉलिवूड पदार्पण केलं. 'बाहुबली' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या गाण्यामध्ये नोराने नृत्यासह अदाकारी केली. 

Oscar 2020 : ऑस्करवर 'पॅरासाईट'चे वर्चस्व; पाहा कोणाला मिळाले पुरस्कार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

50 MILLION views and counting #OSakiSaki  BOOM

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

बॉलिवूडमध्ये येण्याआधी नोरानं वेटरचं, तर कधी लॉटरी विकायचंही काम केलं आहे. कामाव्यतिरिक्त तिने इतरही स्ट्रगल केलं. मुंबईत ती भाड्याच्या घरामध्ये जवळपास आठ मुलींसोबत शेअरींग करत राहत होती. सुरुवातीला नोराला हिंदी आणि इंग्लिशही बोलता येत नसे आणि कळतही नसे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love me love me love me baby  moroccan bollywood style trending worldwide! #arabicdilbar ! Thanks for the love guys! Thank u for supporting my singing debut! Couldnt do it without you —Singers @fnaire_official @norafatehi Presented by @tseries.official Directed by @abderrafia_elabdioui Produced by @norafatehi Choreography by @caesar2373 @boscomartis Shot by @santha_dop Edited by @ady907 Music by @tizafmohcine Costume @suzan1304 Hair and make up @marcepedrozo Jewellery @minerali_store Management @amine_el_hannaoui @bassimbendell @bling_entertainment ————————————— #norafatehi #international #entertainment #culture #fusion #bollywood #dance #music #singing #new #love #passion #musicvideo #dilbar #arabicdilbar #colors #fashion #arabic #indian #style #mood

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "सुरुवातीच्या काळात जेव्हा मी स्ट्रगल करत होते तेव्हा, एका कास्टिंग एजंटशी माझी ओळख झाली होती. पण, त्या व्यक्तीने माझा अपमान केला होता, माझ्या चेहऱ्याबद्दल, शरीराबाबतही तो खूप घाणेरडे शब्द वापरुन बोलला. माझी खिल्ली उडवली. हिंदी येत नसल्याने लोक माझी खिल्ली उडवायचे. ऑडिशनला जातानाही मला खूप अडचणी यायच्या.''

नोरा अभिनेत्री दिशा पटानीची डान्स टिचरही होती. कॅनडावरुन जेव्हा नोरा भारतात आली होती तो तेव्हा तिच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते. नुकतचं तिने 'स्ट्रीट डांसर 3' या सिनेमामध्ये डान्स केला. नोराच्या परफॉर्मन्सची चर्चा चाहत्यांमध्ये होती. राजकुमार राव्या 'स्त्री' या सिनेमामध्ये तिनं 'कमरिया' या गाण्यावर डान्स केला होता. हे गाणं ही खूप फेमस झालं आणि त्यामधील नोराचा डान्सलाही चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unknown facts about dancing queen nora fatehi