esakal | Oscar 2020 : ऑस्करवर 'पॅरासाईट'चे वर्चस्व; पाहा कोणाला मिळाले पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

list of winners of Oscar 2020

दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट' चित्रपटाने यंदाच्या ऑस्करवर आपली मोहोर उमटवली, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार  'जोकर'फेम हॉकिन फिनिक्सला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी जेल्वेगरला जुडी या चित्रपटासाठी मिळाला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पॅरासईट चित्रपटाचे दिग्दर्शक बाँग जून हो यांना पुरस्कार मिळाला.

Oscar 2020 : ऑस्करवर 'पॅरासाईट'चे वर्चस्व; पाहा कोणाला मिळाले पुरस्कार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लॉस एंजेलिस : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य सोहळा आज (ता. १०) लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्करचे यंदाचे ९२वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट' चित्रपटाने यंदाच्या ऑस्करवर आपली मोहोर उमटवली, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार  'जोकर'फेम हॉकिन फिनिक्सला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी जेल्वेगरला जुडी या चित्रपटासाठी मिळाला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पॅरासईट चित्रपटाचे दिग्दर्शक बाँग जून हो यांना पुरस्कार मिळाला.

Oscar 2020 : ऑस्करलाही भावला जोकर; जोकीन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

या ऑस्करमध्ये पॅरासाईट चित्रपटाने कमाल केली असून, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म हे पुरस्कार मिळाले. त्यापाठोपाठ '1917' या चित्रपटाला ४ पुरस्कार मिळाले आहेत.  जोकर चित्रपटाला या ऑस्करमध्ये सर्वाधिक ११ नामांकने होती, या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले आहे.  

Oscar 2020 : ब्रॅड पिट ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

ऑस्करमधील पहिला पुरस्कार हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिट याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मिळाला. 'वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका' या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी त्याला हा सन्मान मिळाला. ब्रॅड पिटसह सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न हिला मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो (पॅरासाईट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर (ज्युडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन फीनिक्स (जोकर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – जोकर
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – जोजो रॅबिट
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा – बॉम्बशेल
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन
सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917
सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर अ गर्ल)
सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी 4
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द नेबर्स विंडो
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

loading image
go to top