'अनपॉझ्ड: नया सफर'मध्ये नागराज मंजुळेच्या 'वैकुंठ'चा समावेश

आशा आणि विजयाच्या प्रेरणादायी कहाणी 21 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नागराज मंजुळे
नागराज मंजुळे

मुंबई - एकीकडे भलेही ओमीक्रॉननं (Omicron) नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण केलं असलं तरी मनोरंजन विश्वामध्ये (Entertainment) नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या कलाकृती समोर आल्या आहेत. त्याची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चाही आहे. एक अशीच दमदार आशयाची कलाकृती 'अनपॉज्ड- ( Unpaused) नया सफर'मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यात कोविड- १९ महामारीमुळे आपलं जीवन कशाप्रकारे बदललं आहे याची झलक पाहायला मिळेल. यात प्रेम, आठवण, भीती, मैत्री अशा वेगवेगळ्या मानवी भावनांचे शब्दचित्रण दाखवले जाणार आहे. शिखा मकान, रूचिर अरूण, नुपूर अस्थाना, अयप्पा केएम आणि नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशीलपणे या गोष्टी सजीव केल्या आहेत. भारत तसेच २४० देशांतील प्राइम सदस्यांना अनपॉज्ड – नया सफर 21 जानेवारीला पाहायला मिळणार आहे.

प्राइम व्हिडिओने आज 'अनपॉज्ड- नया सफर' (Unpaused) या अँथॉलॉजीच्या 21 जानेवारी पासून जगभरातील २४० देशांत प्रीमियर होणार असल्याचे जाहीर केलं आहे. २०२० मध्ये आलेल्या अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर या अमेझॉन ओरिजनल अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म्समधून महामारीमुळे आपल्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने, आपल्याशा वाटणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नव्या वर्षाचे स्वागत करत असताना कशाप्रकारे सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करायला हवा हे सांगण्यात आले आहे.

दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला 'अनपॉज्ड- नया सफर' आपल्याला काळोख्या रात्रींनंतर येणाऱ्या पहाटेच्या प्रकाशाची जाणीव करून देतो. प्रेम आणि सकारात्मकतेनं परिपूर्ण असलेली ही अँथॉलॉजी आपल्या नव्या वर्षाच्या सुरुवातीसह नव्या प्रारंभाचा स्वीकार करण्याची विनंती करते. या अँथॉलॉजीमध्ये पुढील शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे. यामध्ये तीन तिगाडा – रूचित अरूण दिग्दर्शित – सकीब सालेम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन यांचा अभिनय आहे. द कपल – नुपूर अस्थाना दिग्दर्शित – श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशी पेन्युली यांनी काम केले आहे.

नागराज मंजुळे
निष्पाप मराठी युवकांवरील गुन्हे मागे घ्या; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गोंद के लड्डू – शिखा मकान दिग्दर्शित – दर्शना राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी यांची भूमिका आहे. वॉर रूम – दिग्दर्शित अयप्पा केएम – गीतांजली कुलकर्णी, रसिका अगाशे, पुरानंद वांधेकर आणि शर्वरी देशपांडे यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. वैकुंठ – नागराज मंजुळे दिग्दर्शित - अर्जुन करचे, हनुमंत भंडारी यांचा अभिनय आहे.

नागराज मंजुळे
दक्षिण भारतातील या मंदिरात भगवान शिव नागराज म्हणून आहेत विराजमान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com