निष्पाप मराठी युवकांवरील गुन्हे मागे घ्या; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अनेकजण शिक्षण घेत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Belgaon
Belgaon sakal
Updated on

बेळगाव : निष्पाप मराठी युवकांवर घालण्यात आलेले गुन्हे (Crime) मागे घ्यावेत अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच गुन्हे नोंदविण्यात आलेल्या युवकांपैकी अनेकजण शिक्षण घेत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

माजी मराठी नगरसेवकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव शहर आणि परिसराची शांतता भंग करण्यासाठी काही समाजकंटकांनी महापुरुषांचा अपमान करण्यास सुरुवात केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे पडसाद शहर आणि परिसरात उमटले. तसेच महाराष्ट्र विधान सभा व इतर ठिकाणी देखील याबाबत निषेध नोंदविण्यात आला.

Belgaon
नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात

मात्र जे कार्यकर्ते सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन काम करतात. ज्यांनी कोरोनाच्या लाटेमध्ये धोका पत्करुन जनतेची सेवा केली. अशा निष्पाप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये घालण्यात आले आहे. तसेच या युवकांवर राज्यद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत असून काहीजण सिएचा अभ्यासक्रम शिकत आहेत. तर काहीजण महाविद्यालयिन शिक्षण घेत आहेत. याचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके, श्री राम सेनेचे रमाकांत कोंडूसकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिरस्तेदार मंजू जानकी यांनी निवेदनानाचा स्वीकार केला. यावेळी माजी महापौर ऍड नागेश सातेरी, मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, किरण सायनाक, महेश नाईक, माजी उप महापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, विनायक गुंजटकर, राजू बिर्जे, दिनेश रावळ, राकेश पलंगे, विजय भोसले, सुधा भातकांडे, वैशाली हुलजी, प्रशांत भातकांडे, आर आय पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com