Up Election: चर्चा महिला बूथ ऑफिसरच्या ब्युटीची!, चित्रपटाची ऑफर

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूकीचे वारे वाहत आहे. त्यामध्ये पंजाब, चंदीगढ, गोवा, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
Reena Dwivedi
Reena Dwivedi

Entertainment News: देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूकीचे वारे वाहत आहे. त्यामध्ये पंजाब, चंदीगढ, गोवा, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी मतदान सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. (Social media News) अशावेळी सोशल मीडियावर युपीतल्या पोल ऑफिसरची जोरदार चर्चा रंगली आहे. त्या महिला अधिकाऱ्याचे नाव रिना दीवेदी असं आहे. पहिल्यांदा त्यांचे 2019मध्ये फोटो व्हायरल झाले होते. (Up Election 2022) मात्र यासगळ्यात रिना यांच्या फोटोची चर्चा सुरु झाली आहे. त्यांना त्यावरुन चक्क भोजपूरी सिनेमातून ऑफर आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. इंस्टावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

आता त्यांचा पिवळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे त्यांना त्या फोटोंवरुन भोजपूरी मुव्हीतून ऑफर्स यायला सुरुवात झाली आहे. पोलींग बूथवर रिना हजर झाल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेश मधील पोल ऑफिसर म्हणून रिना दिवेदी यांची गेल्या दोन वर्षांपासून नेटकऱ्यांना ओळख आहे. रिनाजी या लोकसभा निवडणूकीच्या वेळी चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा साडीतील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचा पुन्हा एक वेगळा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेस्टर्न अटायरमध्ये त्यांच्या लूकनं नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्या या फोटोंना वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटस मिळाल्या आहेत.

Reena Dwivedi
Katrina Kaif | Video Viral | भांडी घासण्याच्या व्हिडिओनंतर आता झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल |

युपीतील देवोरिया या भागातील रिना राहणाऱ्या आहेत. 2019 मध्ये त्या लाईमलाईटमध्ये आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. इंस्टावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या ही 25 हजारांहून अधिक आहे. लखनौमधील सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ज्युनिअर क्लार्क म्हणून त्या काम करणाऱ्या अधिकारी आहेत. त्यांना आदित्य नावाचा एक मुलगाही आहे. 2019 बरोबरच 2017 मध्ये देखील विधानसभा निवडणूकांच्यावेळी देखील त्यांनी ड्युटी पार पाडली होती. 2019 नंतर त्यांना भोजपूरी चित्रपट क्षेत्रातून त्यांना ऑफर यायला सुरुवात झाली आहे. मात्र त्यांनी सध्या त्यांच्या मुलाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com