esakal | मे महिन्यात OTT वर 'फुल्ल टू धमाल'; नवीन काय रिलीज होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

upcoming movies web serise

मे महिन्यात OTT वर 'फुल्ल टू धमाल'; नवीन काय रिलीज होणार?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे दिवसेंदिवस नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता अव्वल स्थानी आला आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनानं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरी बसलेल्या नागरिकांना जनजीवन कधी पूर्ववत होणार असा प्रश्न पडला आहे. मनोरंजन क्षेत्रावर कोरोनाचे सावट आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांचे प्रदर्शन रखडले आहे. अशावेळी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचालकांनी येत्या महिन्यात मोठ्या संख्येनं मालिका आणि चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे.

कोरोनामुळे सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे मोठमोठ्या निर्माते आणि दिग्दर्शक यांनी आपल्या मालिका आणि सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान याचा राधे द मोस्ट वाँटेड भाई हा मे मध्ये प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 9 मे ला डिस्नी हॉटस्टारवर हम भी अकेले तुम भी अकेले ही हरीश व्यास दिग्दर्शित फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात अंशुमन झा आणि जरीन खान मुख्य भूमिकेत आहे. सलमानचा राधे हा मुव्ही १३ मे ला प्रदर्शित होणार आहे. तो झी प्लेक्स आणि झी ५ वर पाहता येणार आहे. याशिवाय काही डीटीएच प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

१४ मे ला निर्माता आणि दिग्दर्शक राज यांची सिनेमा बंदी नावाची फिल्म नेटफ्लिक्सवर येणार आहे. राज इंडी यांनी तयार केलेला हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या विषय़ावर तयार झालेला आहे. अॅमेझॉन प्राइमवर १५ मे ला व़ंडर वुमन ही हॉलीवूड फिल्म प्रदर्शित होणार आहे. खरं तर गेल्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र सिनेरसिकांच्या आग्रहास्तव तो पुन्हा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर १८ मे ला सरदार का ग्रँडसन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत लीड रोलमध्ये आहेत.

२१ मे ला अॅमेझॉन प्राईमवर फरहान अख्तरचा तुफान नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो ओटीटी वर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. यात परेश रावल फरहान अख्तरच्या कोचची भूमिका करणार आहेत. याबरोबरच २१ मे ला नेटफ्लिक्सवर आर्मी ऑफ द डे नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यात बॉलीवू़डची अभिनेत्री हुमा कुरेशी अभिनय करणार आहे.

loading image