
Urfi Javed : उर्फी आणि उर्फीचे कपडे यावर काय बोलावं हाच प्रश्न आहे. उर्फीनं यापूर्वी तिला कुणी तिच्या कपड्यांवरुन, अजब फॅशनवरुन सुनावलं तर त्याला तिनं जशास तसे उत्तर दिले आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण उर्फीनं त्यांचेही काही ऐकले नाही. याउलट सोशल मीडियावर त्यांच्याविषयी भलतं सलतं लिहित बसली.
उर्फीनं तिची फॅशनची हौस वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून पुरवून घेतल्याचे दिसते. तिनं घरातील स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर तिच्या फॅशनसाठी केला आहे. उर्फीला तिच्या फॅशनवरुन कोण काय बोलते याचा जराही फरक पडत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तिचे एक ट्विट व्हायरल झाले होते. त्यामध्ये तिनं आपल्याकडून आतापर्यत जे काही घडले त्याबद्दल माफी मागितली होती. आपण यापुढे कोणत्याही प्रकारची तऱ्हेवाईक फॅशन करणार नाही. असे ती म्हणाली होती. मात्र तिनं एप्रिल फुल केल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही.
Also Read What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
आता उर्फीच्या अजब फॅशनचा आणखी एक नमुना समोर आला आहे. त्यामध्ये तिनं एक एक्स रेचा फोटो शेयर करुन तो अंगावर लावत चाहत्यांना मोठा धक्का दिल्याचे दिसून आले आहे. या फोटोवर व्हायरल झालेल्या कमेंटस भलत्याच भन्नाट आहे. शेवटी उर्फीनं पुन्हा एकदा ती काय करु शकते हे दाखवून दिले आहे. तिचा नाद करणे चुकीचे आहे. याशिवाय तिला काही समजावून सांगणेही कसे धोकादायक असू शकते याचा प्रयत्य नेटकऱ्यांना आला आहे.
अतरंगी फॅशनमुळे उर्फी नेहमीच सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसते. कोणत्याही वस्तूच्या आधारे उर्फी फॅशन करु शकते हे दिसून आले आहे. म्हणून की काय तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. यापूर्वी उर्फीनं काचेच्या, प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या आधारे केलेली फॅशन नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय झाला होता. यासगळ्यामुळे उर्फीला मुंबईमध्ये राहण्यासाठी घर देखील मिळत नाही. असे तिनंच म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.