

Urfi Javed Kissing Another Girl photo viral social media rumors : मनोरंजन विश्वात उर्फीची वेगळीच ओळख आहे. ती वेगळ्या कारणासाठी आहे. उर्फीला चर्चेत राहण्यासाठी कोणतेही कारण पुरते. बऱ्याचदा उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. आता उर्फी विषयी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
खरं तर उर्फीच्या वैयक्तिक नात्याबद्दल यापूर्वी तिच्या एका जवळच्या मित्रानं ट्विटरवरुन खुलासा केला होता. त्यात उर्फीनं त्याला खूपच अपमानकारक शब्द वापरले होते.त्यानंतर त्यानं उर्फीच्या व्यक्तिमत्वाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याविषयी तिच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या
उर्फी ही एका मुलीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ती एका मुलीला किस करत असल्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यामुळे उर्फी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उर्फीनं काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटीमधील सहभागी कलाकारांविषयी केलेली कमेंट यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता उर्फी लेस्बियन आहे असं तिच्याविषयी बोललं जातंय.
उर्फी ही नेहमीच तिच्या परखड स्वभाव आणि वक्तव्याविषयी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर तिचे व्हायरल होणारे फोटो देखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. उर्फीनं तिच्या अतरंगी फोटोमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या कपड्यांचा आणि सार्वजनिक ठिकाणी अतरंगी फोटो काढण्याच्या सवयीमुळे तिला काही राजकीय पक्षांच्या संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं.
उर्फीचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.त्यात उर्फी तिच्या एका मैत्रीणीला किस करताना दिसत आहे. यावेळी उर्फी तिच्या कपड्यांमुळे नव्हे तर मैत्रीणीलाच किस करण्यामुळे ट्रोल झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.