Urfi Javed: वाद मिटला? चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed vs Chitra Wagh

Urfi Javed: वाद मिटला? चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदचे कौतुक

Urfi Javed vs Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदला कपड्यांवरुन टार्गेट केलं होतं. उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे उर्फी मात्र काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत ती पाहिजे तसे कपडे घातल आहे. उलट चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ट्विट देखील करत होती. पण आता यांच्यातील वादावर पडदा पडला असल्याचे दिसत आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, माझा विरोध हा कुठल्या महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हताच आणि नाही तो विरोध विकृतीला होता पण आता तुम्ही कौतुक केलं पाहिजे कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसते आहे. कोण सुधारत असेल तर त्याचे कौतुक पण केले पाहिजे.

तिने काही ठरवले असेल कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतेय. मला अनेक जण फोटो पाठवत आहेत त्यामध्ये ती चांगली कपडे घालते आहे तिचं कौतुक केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणनं आहे की बाई कपडे घाल आणि फिर.

टॅग्स :actressmodel