
Urfi Javed : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. पण गेले काही दिवस तिने चक्क कपडे काढून फोटो शूट करण्याचा सपाटाच लावला आहे. तिच्या या लुकची सध्या बरीच चर्चा आहे. (uorfi javed news sakal) (urfi javed semi-nude photoshoot she covered her body with her long hair)
काही दिवसांपूर्वी उर्फीने टीशर्ट वर करून आपले अर्धे अंग हाताने झाकले होते. त्याला काही दिवस होत नाही तोवर ती विनाकपडे कॅमेऱ्यासमोर आली आणि डान्स करत सर्वांचे लक्ष वेधले. तेव्हा तिने केवळ हिरव्या दोऱ्या गुंडाळून बाकी अंग हाताने झाकले होते. याला काही दिवस उलटतायत तोवरच उर्फीने टॉपलेस होऊन फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने कमरेच्या वर कोणतेही कपडे घातलेले नसून केवळ आपल्या केसांनी अंग झाकले आहे.
उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. उर्फीची ही फॅशन कुणाला आवडते तर कुणी याला विक्षिप्तपणा म्हणतात. अनेक नेटकरी तिच्यावर सडकून टीका देखील करतात. मध्यंतरी रणवीर कपूरनेही एका कार्यक्रमात उर्फीच्या फॅशनवर विनोद केला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षात आपल्या विचित्र फॅशनने उर्फीने सर्वांचेच लक्ष स्वतःकडे वळवले आहे. एक दिवस मी विनाकपडेच तुमच्यासमोर येईल, असेही ती म्हणाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.