Urfi Javed: सगळं तर सारखचं फक्त आकारच... उर्फी काय बोलून गेली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: सगळं तर सारखचं फक्त आकारच... उर्फी काय बोलून गेली?

 उर्फी जावेदबद्द्ल काही वेगळं सांगायची गरज नाही. तिचे नावचं तिची ओळख देण्यासाठी पुरेसा आहे. तिच्या अतरंगी कपड्यावरुन ती तिचा फॅशन सेन्स मिरवत असते.नेहमीच चर्चेत आणि वादात राहणं हा तिचा जणु छंदच झाला आहे.

हेही वाचा: Urfi Video: उर्फी झोपाळ्यावरुन पडली अन् गर्दी जमली...

रणवीर सिंगही त्यांच्या फॅशन सेन्समूळे चांगलाच चर्चेत राहतो. त्यामुळे त्याची तुलना बऱ्याच वेळा उर्फीसोबत होत असते. विषेश म्हणजे त्याला कॉफी विथ करणमध्ये तिच्या फॅशन सेन्स बद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांने उर्फीच्या फॅशन सेन्सचं भरभरुन कौतुक केलं. त्याच्या या वक्तव्यांनतर उर्फी आणि रणवीर सिंग दोघेही बरेच चर्चेत आले होते. यात कहर तेव्हा झाला जेव्हा  उर्फीने रणवीरसमोर दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. उर्फीने म्हटले होते की, जर रणवीर सिंगला पुन्हा लग्न करायचे असेल तर ती त्यासाठी नेहमीच तयार आहे.

 त्यातच तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे. मुलाखतीदरम्यान उर्फीला रणवीर सिंगची एका ओळीत व्याख्या करण्यास सागण्यात आले तेव्हा ती म्हणाली ,‘मला वाटते की मी लेडी  रणवीर सिंग आहे आणि तो मेन उर्फी जावेद आहे.

हेही वाचा: Urfi Javed: अबब! उर्फी आहे इतक्या कोटींची मालकीण..

उर्फी तिच्या आउटफिटमूळे नेहमीच ट्रोल होत असते. याचबद्दल मुलाखतीदरम्यान उर्फीला तिच्या आउटफिटबद्दल एक प्रश्न विचारण्यात आल, यातील तिचं एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. तिच्या या प्रश्नाचं उत्तर अत्यंत भयानक होतं.उर्फी म्हणाली- मी खोटे बोलणार नाही, मला कसली लाज वाटत नाही. ट्रोलिंग अनेकवेळा होते. पण मला माझ्या शरीरात खूप आराम वाटतो. माझा वॉर्डरोब खराब असला तरी मला काही फरक पडत नाही. प्रत्येकाने सर्व काही पाहिलेलेच असते त्यात काहीही नवीन दिसणार नाही. तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे आहे, यात फक्त आकारात फरक आहे. उर्फी नेहमीच असं बेताल वक्तव्य करत असते.