Urfi Javed : सोशल मीडिया क्विन उर्फी जावेद टीव्हीवर हिट ठरणार? रिॲलिटी शोसाठी नाव चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uorfi Javed Latest News

सोशल मीडिया क्विन उर्फी जावेद टीव्हीवर हिट ठरणार? रिॲलिटी शोसाठी नाव चर्चेत

Uorfi Javed Latest News बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी उर्फी जावेद एंटरटेनमेंट क्वीन आहे. उर्फीला फॅशन क्वीन म्हणून ओळखले जात असले तरी तिची प्रत्येक स्टाइल चाहत्यांना वेड लावते. उर्फी जावेद आता डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा १०’मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. उर्फी जावेद या शोचा भाग आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

टीव्हीचा सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटी डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा’ ५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करीत आहे. टीव्ही जगतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होत आहेत. उर्फी जावेदने झलक दिखलाजा च्या लाँच पार्टीला हजेरी लावली होती. यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून असे मानले जात आहे की उर्फी देखील झलक दिखला जा शोचा एक भाग आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan : शाहरुखने डॉन ३ नाकारला? शाहरुख स्क्रिप्ट निवडण्याची घाई करणार नाही

व्हिडिओ शेअर करताना उर्फीने लिहिले, ‘सुपर एक्साइटेड, कारण माझा आवडता शो ५ वर्षांनंतर परतत आहे. म्हणूनच मी हा डिस्को थीम ड्रेस झलक दिखला जा १० ला समर्पित करते’. उर्फी जावेदची पोस्ट झलक दिखला जा शोमध्ये नृत्य कौशल्याने चाहत्यांची मने जिंकणार असल्याचे संकेत देत आहे.

उर्फीचे फॅशन स्टेटमेंट ठरले हिट

उर्फीचे फॅशन स्टेटमेंट हिट ठरले आहे. तिने नेहमीच विचित्र आणि आकर्षक पोशाखांनी चाहत्यांना थक्क केले आहे. पण प्रश्न असा आहे की उर्फी जर झलक दिखला जा १० या डान्स रिॲलिटी शोचा भाग बनली तर ती नृत्याने चाहत्यांना प्रभावित करू शकेल का? फॅशनप्रमाणे उर्फीही टीव्हीवर धमाल करू शकेल का?

हेही वाचा: Bullet Rani Arrested : शिवांगी डबास अटकेत; पोलिसांवर हात उचलल्याचा आरोप

उर्फीचा बिग बॉसचा प्रवास सुपर फ्लॉप

उर्फी पहिल्यांदा बिग बॉस ओटीटी या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. मात्र, उर्फी या शोमध्ये काही अप्रतिम दाखवू शकली नाही. पहिल्या आठवड्यातच शोमधून बाहेर पडली होती. उर्फीचा बिग बॉसचा प्रवास सुपर फ्लॉप ठरला. बिग बॉसनंतर आता उर्फी दुसऱ्या बिग रियालिटी शो झलक दिखला जामध्ये येणार असल्याची चर्चा आहे. आता या शोमध्ये (TV Show) अभिनेत्री डान्सने काही अप्रतिम दाखवू शकते का, हेही लवकरच कळेल.

Web Title: Urfi Javed Social Media Reality Tv Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..