'ना चांगलं तोंड, ना अ‍ॅक्टिंगचा पत्ता तरी उदय चोप्राला काम मिळतं कसं?' उर्फीचा थेट निशाणा| Urfi Javed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed : 'ना चांगलं तोंड, ना अ‍ॅक्टिंगचा पत्ता तरी उदय चोप्राला काम मिळतं कसं?' उर्फीचा थेट निशाणा

Urfi Javed tv entertainment actress comment : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी ही तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनसाठी ओळखली जाते. उर्फीची अदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून उर्फीनं आपल्या परखड बोलण्यानं वेगळ्याच विषयाला सुरुवात करुन दिली आहे. उर्फीच्या पेहरावावरून वाद सुरु झाला होता.

आता उर्फीनं थेट बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते आदित्य चोप्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य यांनी काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील नेपोटिझमविषयी मतप्रदर्शन केलं होतं. यश चोप्रा यांचे चिरंजीव म्हणून ओळख असलेल्या आदित्य चोप्रा यांच्या बॉलीवूड ग्लॅमरविषयी अनेकांना माहिती आहे. अशातच उदय चोप्राबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. यात उर्फीनं उदयवरुन आदित्य चोप्रा यांना टोला लगावला आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तसं असतं तर अजुनही आम्हाला उदयला कुठे स्टार बनवता आलं, त्याच्या मागे तर यशराज सारखे मोठे बॅनर होते मात्र तो अजुनही चांगल्या हिटच्या शोधात आहे. अशा आशयाचे विधान आदित्य चोप्रा यांनी केले होते. ते मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. त्यानंतर आता त्यावर उर्फीनं उदय चोप्राची शाळा घेतली आहे. नेटकऱ्यांनी देखील काही दिवसांपासून उदय चोप्रावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Urfi Javed

Urfi Javed

नेटफ्लिक्सवर सध्या यशराज फिल्म्सच्या रोमँटिक नावाच्या डॉक्युमेंट्रीची चर्चा आहे. त्यामध्ये आदित्य चोप्रा यांना आपल्या भावाला उदय चोप्राला मोठा स्टार बनवता आले नाही अशी खंत व्यक्त केली होती. त्यावर उर्फीनं दिलेली प्रतिक्रिया भलतीच तिखट आहे. ती म्हणते, जर त्याचे नाव उदय चोप्रा ऐवजी उदय चौहान असे असते तर त्याला आतापर्यत जेवढी संधी मिळाली आहे तेवढीही मिळाली नसती. बॉलीवूडमध्ये सारखी संधी मिळत नाही. उदयला मिळाली कारण त्याचे आडनाव चोप्रा होते.