esakal | आणखी एका अभिनेत्रीचा संसार मोडला; 'उरी' फेम किर्ती कुल्हारी होणार पतीपासून विभक्त
sakal

बोलून बातमी शोधा

kirti kulhari

'विभक्त होण्याचा निर्णय घेणं अजिबात सोपं नाही, किंबहुना ते कधीच नसतं'

'उरी' फेम किर्ती कुल्हारी होणार पतीपासून विभक्त

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री किर्ती कुल्हारीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. किर्तीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. कागदावर नाही तर आयुष्यात आम्ही एकमेकांपासून वेगळे होत आहोत, असं तिने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. पतीपासून विभक्त होण्याचं कारण किर्तीने यात लिहिलं नाही. त्याचप्रमाणे या विषयावर पुढे काही भाष्य करणार नसल्याचंही ती पोस्टच्या अखेरीस म्हणाली. किर्तीच्या या पोस्टने अनेकांनाच धक्का बसला आहे. 

काय आहे किर्तीची पोस्ट?
'मी सर्वांना सांगू इच्छिते की पती साहिल आणि मी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कागदावर नाही तर खऱ्या आयुष्यात आम्ही विभक्त होत आहोत. एखाद्यासोबत असण्यापेक्षा एखाद्यापासून वेगळं होण्याचा निर्णय कठीण असतो. कारण एकत्र येण्याचा आनंद सर्वजण मिळून साजरा करतात. विभक्त होण्याचा निर्णय अत्यंत त्रासदायक आणि दु:खदायक आहे. हे अजिबात सोपं नाही आणि कदाचित ते कधीच सोपं नसतं. पण आता जे आहे ते आहे. ज्यांना माझी काळजी आहे, त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की मी ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी अपेक्षा करते. यापुढे मी या विषयावर काहीच बोलणार नाही', अशी पोस्ट किर्तीने लिहिली. 

हेही वाचा : सना खानच्या पतीचं खास सरप्राइज; बुर्ज खलिफाच्या १२२व्या मजल्यावर दिली सोन्याची कॉफी 

'पिंक' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर किर्ती प्रकाशझोतात आली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन-चार महिन्यांपूर्वी किर्तीने साहिलशी लग्नगाठ बांधली. किर्ती तिच्या खासगी आयुष्यावर फार कधी व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे तिच्या लग्नाविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती. 'पिंक'नंतर किर्तीने 'उरी' आणि 'मिशन मंगल' या चित्रपटांमध्ये काम केलं. 

loading image