Urmila Nimbalkar : स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी पहिली मराठी YouTuber | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila Nimbalkar YouTuber

Urmila Nimbalkar : स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी पहिली मराठी YouTuber

Urmila Nimbalkar YouTuber अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही मराठी प्रेक्षकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. उर्मिलाने स्वतःचे यूट्यूब (YouTube) स्टुडिओ सुरू केले आहे. तिला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.

अभिनेत्री (Actress) बऱ्याचदा विविध मेकअप उत्पादनांचे व्हिडिओ आणि स्किनकेअर रूटीनचे पुनरावलोकन शेअर करते. उर्मिला निंबाळकर हिने यूट्यूबवर फॅशन टिप्सही शेअर करायला सुरुवात केली आहे. उर्मिलाने आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या नवीन यूट्यूब (YouTube) स्टुडिओबद्दल शेअर केले.

हेही वाचा: Raju Shrivastava : राजूचे कुटुंब पोहोचले गुरुद्वारात; सुनील पाल म्हणाला...

उर्मिला निंबाळकरला खरी ओळख दिली ती सोशल मीडियाने (Social Media). एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘शेवटी... आम्ही आमचा स्वतःचा यूट्यूब स्टुडिओ बनवला आणि तिथे आम्ही आमचे पहिले शूट केले. चार वर्षांपूर्वी आमचा यूट्यूबचा प्रवास मोबाईलवर सुरू झाला. तेव्हा लाईट नव्हती, माईकचे बजेट नव्हते. त्यामुळे जोपर्यंत आऊटडोअर लायटिंग होती तोपर्यंत शूट संपवावा लागायचा.

प्रत्येक महिन्यात वाटायचं की आपण चॅनल बंद करावं. मात्र, चुकांमधून शिकले. विषयांवर काम केले. प्रेक्षकांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहून काम करीत राहिलो. मग ‘लोग साथ आते और करवता बन गया’, असे उर्मिलाने पोस्टमध्ये सांगितली. उर्मिलाचे पती सुकृत यानेही पत्नीचे यश इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे.

हेही वाचा: Rahul Mahajan : टीव्ही शोमध्ये राहुलने १८ वर्षांनी लहान पत्नीवर केले भाष्य

एक मिलियन सबस्क्राइबर्स... आमच्या YouTube कुटुंबाने एक मैलाचा दगड गाठला आहे. आता गोल्डन बटणाचे वेड लागले आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार... असेच प्रेम करत राहा, असे सुकृतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Web Title: Urmila Nimbalkar Youtuber Own Studio First Marathi Actress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :YouTube