Urvashi Rautela: 'त्याच्याशिवाय करमेना, बोलल्याविना जमेना'! RP म्हणजे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela Rishabh Pant

Urvashi Rautela: 'त्याच्याशिवाय करमेना, बोलल्याविना जमेना'! RP म्हणजे...

Urvashi Rautela & 'RP': भारतीय क्रीडा विश्वातील प्रसिद्ध खेळाडू ऋषभ पंत हा नेहमीच चर्चेत असतो. त्याला चर्चेत आणण्याचे बरेचसे श्रेय अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्वशी रौतेलाला जातं. या दोघांमध्ये सारखी भांडणंही होत असतात. एकमेकांवर कमेंट करणे, टोमणे मारणे यासंबंधीच्या दोन्ही सेलिब्रेटींच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये उर्वशीनं चाहत्याची भूमिका निभावली होती. भारताच्या मॅचला तिची असलेली उपस्थिती आणि यावेळी ऋषभ पंतसाठी केलेल्या पोस्ट या चर्चेत आल्या होत्या. त्यावरुन पुन्हा एकदा ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यातील डेटिंगवरुन नेटकऱ्यांनी ऋषभला छेडले होते. ऋषभच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नेटकऱ्यानं दिलेल्या कमेंटवरुन त्याला रागही आला होता. आता उर्वशीनं पुन्हा एकदा ऋषभला डिवचलं आहे. तिचा तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

हेही वाचा -आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

ऋषभला त्याचे अनेक सहकारी आरपी या शॉर्ट नावानं ओळखतात. कदाचित ही गोष्ट उर्वशीला माहिती नसावी. त्यावरुन तिला एका चाहत्यानं विचारलेला प्रश्न आणि तिनं त्यावर दिलेलं उत्तर मोठं गंमतीशीर आहे. उर्वशीनं आपल्या नेहमीच्या खास शैलीत ऋषभला सुनावलं आहे. असं होय, मला आरपी म्हणजे नक्की माहितीच नव्हतं. त्याचा अर्थ ऋषभ पंत असा होतो तर... मला तर माझा एक को स्टार राम पोथिनेनी आहे हे माहिती आहे. त्यावर नेटकऱ्यांनी उर्वशीला दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

Urvashi Rautela

Urvashi Rautela

आऱपी या नावामुळे गोंधळ झालेला दिसतो आहे. त्यामुळे मला हे सविस्तरपणे सांगावे लागत आहे. असे उर्वशीनं म्हटलं आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी विचारणा केली. मला हे माहितीच नव्हतं की ऋषभला देखील आरपी म्हणतात. माझ्या एका सहकलाकाराचे नाव हे राम पोथिनेनी असे आहे. एका नेटकऱ्यानं उर्वशीला त्याच्यावर बोलल्याशिवाय काही करमत नाही. अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे.