'ऋषभ तुझं काही खरं नाही, वाढदिवसापूर्वीच उर्वशीनं चक्क...' |Urvashi Rautela | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Urvashi Rautela : 'ऋषभ तुझं काही खरं नाही, वाढदिवसापूर्वीच उर्वशीनं चक्क...'

Urvashi Rautela : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक आणि स्टार फलंदाज ऋषभ पंत हा काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाली होता. एका रुग्णालयामध्ये तो उपचार घेत होता. दरम्यान त्याला टीव्ही अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावावरुन ट्रोल केले जात होते. उर्वशीच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरुन नेटकरी ऋषभला वेगवेगळया प्रतिक्रिया देत होते.

उद्या उर्वशीचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी तिनं जो फोटो शेयर केला आहे त्याची चर्चा सुरु झाली आहे. आपल्या बोल्डनेससाठी आणि हटक्या स्टाईलसाठी उर्वशी ओळखली जाते. अशावेळी तिच्या एका भलत्याच बोल्ड फोटोमुळे बिचाऱ्या ऋषभला नेटकऱ्यांची बोलणी खावी लागली आहे.असे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे. काहींनी त्याला भलेही तू बरा झाला असशील पण उर्वशी तुझी डोकेदुखी वाढवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रतिक्रिया त्या पोस्टवर आल्या आहेत.

Also Read - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

काही तासांपूर्वी उर्वशीनं तो फोटो शेयर केला असून त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. एका नेटकऱ्यानं तर ऋषभ तुझं आता काही खरं नाही, उर्वशी तुला सहजासहजी सोडणार नाही असे म्हटले आहे. अनेकांनी उर्वशीला ऋषभचा विचार कऱण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी अजुनही तू कुणाचचं ऐकत नाही. अशी तक्रारही तिच्याकडे केली आहे.

उर्वशीनं इंस्टावर जो फोटो शेयर केला आहे तो भलताच बोल्ड असून त्यामुळे ऋषभला अनेकांनी छेडले आहे. उर्वशीनं तो फोटो शेयर करताना त्यावर लिहिलं आहे की, आज केवळ कँडल्स नाही तर आणखी शानदार पार्टी होणार हे नक्की...त्या फोटोंना तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

उर्वशीनं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नासीम शाहच्या जन्मदिनी खास पोस्ट केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यावरुन उर्वशीला ट्रोल करण्यात आले होते. ऋषभ अजून बराही झाला नाही तोच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच्या प्रेमात उर्वशी कशी काय पडली, अशी प्रतिक्रिया त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिली होती.