
Urvashi Rautela: 'आता ऋषभ नही तर पाकिस्तानचा नसीम', पापाराझींचा उर्वशीला प्रश्न नेटकऱ्यांनीच दिलं उत्तर
अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ही तिच्या कामामुळे कमी तर तिच्या सोशल मिडियाच्या पोस्टमुळे चर्चेत असते. तिला अनेकदा भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत या नावानंही छेडलं जातं. ती कुठल्या क्रार्यक्रमातही गेली तरी तिला ऋषभ पंतच्या नावाने चिडवलं जातचं.
असाच काहीसा प्रकार आज पुन्हा एकदा घडला आहे. जेव्हा विमानतळावर पापाराझींनी तिला स्पॉट केलं. तेव्हा पापाराझींनी तिला या क्रिकेटर ऋषभबद्दल विचारलं, ज्यावर तिने अशा प्रकारे उत्तर दिले की सोशल मीडिया चर्चा सुरु झाली आहे.
ऋषभ पंतच्या अलीकडच्या पोस्टबद्दल पापाराझींनी तिला विचारल्यावर ती म्हणाली, उर्वशी मॅम इन्स्टा वर फोटो पाहिला तुम्ही. यानंतर उर्वशीने कोणता फोटो विचारला? पापाराझी म्हणतात- अरे ऋषभ पंत बरे होत आहे.
उर्वशी होकार देत म्हणते, 'होय, होय, तो भारताची संपत्ती आहे. देशाचा अभिमान आहे'. पापाराझी म्हणतात, 'आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.', तर उर्वशी म्हणते, 'मी ही'. मग काय, हा व्हिडिओ समोर येताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी मीडियाच्या प्रश्नांची खिल्ली उडवली तर काहींनी अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेची खिल्ली उडवली.
प्रतिक्रिया देतांना नेटकरी म्हणतं आहेत, ' ही इतकी भोळी बनत आहे, मग स्टोरी का टाकते','अरे आता तिने पार्टी बदलली आहे. तिला नासिम बद्दल विचारा', एकाने लिहिले - नसीम शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ती आली होती का?
त्याच झालं असं की, उर्वशीनं नसीमच्या पोस्टला कमेंट करत म्हटले होते की, वाढदिवसाच्या आणि तुझ्या डीएसपी पोस्टिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यावर नसीमनं देखील तिला धन्यवाद म्हणून प्रतिसाद दिला आणि त्यानंतर नविन चर्चांना उधाण आलं होतं.