Urvashi: ऋषभवर नव्हे 'पाकिस्तानी' क्रिकेटरवर क्रश, उर्वशीवर नेटकऱ्यांचं 'टीकास्त्र'| Urvashi Share Pakistani Cricketer Naseem Shah Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Urvashi news

Urvashi: ऋषभवर नव्हे 'पाकिस्तानी' क्रिकेटरवर क्रश, उर्वशीवर नेटकऱ्यांचं 'टीकास्त्र'

Urvashi Rautela Share Pakistani Cricketer Naseem Shah Video: बॉलीवूडची उर्वशी ही सध्या सोशल मीडियावर चमकताना दिसते आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यांना तिनं लावलेली हजेरी, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (bollywood Actress urvashi rautela) सोबत तिचा सुरु असलेला वाद यामुळे तिनं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही सेलिब्रेटी चाहते आणि नेटकरी यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्यातील अनोखी केमिस्ट्री चाहत्यांना (entertainment news) आवडते. तर नेटकऱ्यांसाठी ती मोठ्या प्रतिक्रियेचा विषय असते. अशातच उर्वशीनं आपला तऱ्हेवाईकपणा दाखवत एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं एका पाकिस्तानी खेळाडूचं कौतूक केलं आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

उर्वशी आणि ऋषभचा वाद हा आता जगजाहीर झाला आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांना पाण्यात पाहतात. कधी उर्वशी ऋषभवर निशाणा साधते तर कधी ऋषभ उर्वशीला जशास तसं उत्तर देताना दिसतो. आता मात्र उर्वशीनं असं काही केलंय की, नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलचं सडकून काढल्याचं दिसून आलंय. उर्वशीनं इंस्टावर एक स्टोरी शेयर केली आहे. ज्यात तिनं पाकिस्तानी खेळाडून नसीम शहाचा फोटो शेयर केला आहे. एवढचं नाहीतर त्याचा एक व्हिडिओही शेयर केला आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

तो व्हिडिओ व्हायरल होताच मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी उर्वशीला धारेवर धरले आहे. आता तुला ऋषभ नव्हे तर पाकिस्तानी खेळाडूवर क्रश आहे का असा प्रश्न तिला विचारला आहे. युझर्सचं असं म्हणणं आहे की, उर्वशी विनाकारण ऋषभ पंतला लक्ष्य करताना दिसत आहे. 4 सप्टेंबरला भारत पाकिस्तान असा सामना झाला होता. तो पाहण्यासाठी उर्वशी दुबईला गेली होती. त्यावेळी तिची नजर ही ऋषभवर नव्हे तर पाकिस्तानी खेळाडू नसीमवर असल्याचे युझर्सनं म्हटलं आहे. त्यावरुन तिला ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा: संतांच्या वाङ्मयात प्रकटलेला गणेश....

यासगळ्यात उर्वशीवर टीका होताना दिसतेय. अनेकांनी तिला पाकिस्तानी खेळाड़ूवर तुझं क्रश आहे का असं म्हणतं ऋषभ का आवडत नाही असा प्रश्न तिला केला आहे. तिनं शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये नसीन हा हसत असून त्याची स्टाईल उर्वशीला भलतीच भावली आहे. तिनं लाजत मुरडत रिअॅक्शन देत तो फोटो शेयर केला आहे.

हेही वाचा: स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगार

Web Title: Urvashi Rautela Share Pakistani Cricketer Naseem Shah Video Rishabh Pant Fans Trolled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..