निधनानंतर सावन कुमार टाक चर्चेत,एक्स-वाईफचा दिग्दर्शकाच्या विवाहबाह्य संबधांवर खुलासा

सावन कुमार टाक यांच्याशी लग्न केल्यानंतर संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना ७ वर्षांतच त्यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.
Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs
Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairsGoogle
Updated on

Sawan Kumar Tak: निर्माते सावन कुमार टाक (Sawan Kumar Tak) यांचे २५ ऑगस्ट,2022 रोजी निधन झाले होते. त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी उषा खन्ना यांनी त्यावेळी बोलणं टाळलं होतं. त्या एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शिका राहिल्या आहेत. जगासमोर सावन कुमार टाक आणि आपल्या नात्याविषयी बोलणं त्यांना तेव्हा योग्य वाटलं नव्हतं. पण आता अनेकांना माहीत नसलेले काही खुलासे उषा खन्ना यांनी केले आहेत. सावन कुमार टाक यांच्या निधनानंतर काही दिवसांनी उषा खन्ना यांनी आपली लव्ह स्टोरी आणि तुटलेलं नातं यावर मोकळेपणानं बोलणं पसंत केलं.(Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs)

Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs
ब्रह्मास्त्रची पोलखोल करतोय ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ; म्हणाले होते,'काय वेगळं...'

एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना उषा खन्ना म्हणाल्या,''मी एका सिनेमाचं संगीत करत होते. त्यावेळी सावन कुमार तिथे आले होते. ते त्या सिनेमासाठी गाणं लिहित होते. आमच्यात कामामुळे चांगलं बॉन्ड बनलं. त्यांनी लगेचच त्यांचा आगामी सिनेमा 'हवस' साठी मला संगीतकार म्हणून साइन केलं. त्यादरम्यान आमच्यात मैत्री झाली आणि तिचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर आम्ही लग्न केलं पण आम्हा दोघांची कुटुंबं त्या लग्नाला हजर नव्हती''.

Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs
नवीन जाहिरातीमुळे अक्षय पुन्हा गोत्यात, आता हुंडा प्रथेला प्राधान्य देताना दिसला

लग्नाच्या ७ वर्षानंतर आपलं लग्न का तुटलं हे सांगताना उषा खन्ना म्हणाल्या,''काही वर्ष संसार केल्यानंतर आपण ज्या व्यक्तीसोबत राहत आहोत त्याच्या काही गोष्टी तुम्हाला खटकू लागतात. सारखं भांडण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं असं वाटू लागतं. मी ज्याच्यावर प्रेम करायचे अशा व्यक्तीविषयी मी वाईट कसं बोलू. पण आम्ही एकत्र नाही राहू शकलो. आमच्यात वैचारिक मतभेद होते. आम्ही निर्णय घेतला,तु तुझ्या जागी योग्य, मी माझ्या जागी योग्य, मित्र बनून राहू पण यापुढे पती-पत्नी म्हणून नको. आज मला माझ्या मित्राची खूप आठवण येते. जे नातं मित्र म्हणूनआमच्यात पक्क होतं,ते लग्नानंतर नवरा-बायको म्हणून नाही होऊ शकलं''.

Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs
'गाडी ठाण्यात आली अन्...',CM एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये क्षितिशला आलेला भन्नाट अनुभव

'सावन कुमार यांच्या खूप मैत्रिणी होत्या,त्यांचे विवाहबाह्य संबंध होते का?' या थेट प्रश्नावर उषा म्हणाल्या,''हो,होते. ते मला कळल्यावर मीच म्हटलं,वेगळं होऊया आणि यापुढे मी तुम्हाला कशाविषयीच काही विचारणार नाही. खूप वाईट वाटायचं तेव्हा. कारण मी सुद्धा एक माणूस होते, पत्नी होते. फक्त मी म्हटलं, तु तुझ्या जागी,मी माझ्या जागी राहणं योग्य,आणि वेगळे झाले कारण मला त्यांच्याशी भांडत संसार नव्हता करायचा''.

Usha Khanna On why she ended her marriage with indian filmmaker sawan kumar tak, revealed his extra-marrital affairs
मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन विषयी दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,वाचा सविस्तर

'विवाहबाह्य संबंध हेच एक कारण लग्न तुटण्याचं होतं का?' यावर उषा खन्ना म्हणाल्या ,''त्यांच्या खूप गर्लफ्रेंड्स होत्या. आणि त्यांचे सावन कुमार यांच्या आयुष्यात खास स्थान होते. त्या खूप महत्त्वाच्या होत्या सावन कुमार यांच्यासाठी. मग मी हे कसं सहन करत बसले असते? शेवटी नाती काचेसारखी असतात. आमच्यात दुरावा येऊ लागला होता. पण मी या सगळ्यामुळे रडत बसायचं नाही ठरवलं आणि लग्नाचं बंधन तोडून टाकलं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com