Vaalvi Movie: मराठी सिनेमाचा परदेशात डंका.. महाराष्ट्र गाजवून अमेरिकेत सुद्धा वाळवी हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaalvi movie, vaalvi, vaalvi in america

Vaalvi Movie: मराठी सिनेमाचा परदेशात डंका.. महाराष्ट्र गाजवून अमेरिकेत सुद्धा वाळवी हाऊसफुल्ल

Vaalvi Movie News: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' या मराठी सिनेमाची क्रेझ काही ओसरत नाही. वाळवी प्रदर्शित होऊन आता ४ आठवडे झाले. तरीही हा सिनेमा आजही महाराष्ट्रातल्या तमाम थियेटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरु आहे. 'वेड' नंतर वाळवी सुद्धा मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालाय. आता वाळवी हा सिनेमा महाराष्ट्र गाजवून परदेशात सुद्धा स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतोय.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला वाळवी सिनेमा १३ जानेवारी २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर वाळवी अल्पावधीत लोकप्रिय झाला. थ्रिलकॉम धाटणीचा हा सिनेमा पाहायला प्रेक्षक पुन्हा पुन्हा गर्दी करत आहेत. आता वाळवी निमित्ताने मराठी सिनेमाचा डंका परदेशात गाजतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे.

वाळवी आता अमेरिकेत सुद्धा प्रचंड गाजतोय. अमेरिकेत वाळवी काहीसा उशिरा प्रदर्शित झाला. पण अमेरिकेतले प्रेक्षक आणि विशेषतः मराठी प्रेक्षक वाळवी ला उचलून धरत आहे. अमेरिकेत वाळवीचा यशस्वी असा दुसरा आठवडा सुरु झालाय. झी स्टुडिओजने त्यांच्या सोशल मीडियावर अमेरिकेतल्या थियेटरची लिस्ट शेयर केली आहे. यावरून वाळवी अमेरिकेत काही सिनेमागृहात प्रेक्षकांच्या प्रतिसादात उत्तम सुरु आहे.

सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांचा वाळवी सिनेमा प्रचंड गाजला. वाळवी पाहून अनेकांचं डोकं चक्रावलं. समीक्षकांनी सिनेमाला चांगलंच गौरवलं. प्रेक्षकांनी सुद्धा सिनेमाला अनपेक्षित रित्या उदंड प्रतिसाद दिला. वाळवी ने बॉक्स ऑफिसवर जे यश संपादन केलं त्यामुळे मराठी सिनेमाला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

याशिवाय वाळवी सिनेमाने जे यश मिळवलं त्यामुळे निर्मात्यांनी वाळवी सिनेमाचे कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित केली. या सक्सेस पार्टीत सिनेमाचे वाळवी सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी २ ची घोषणा केली. त्यामुळे सिनेमाच्या टीमने पार्टीत एकच जल्लोष केला.