Vaalvi Movie: वाळवी पाहून डोकं सुन्न झालं, आत्ता वाळवी २ येणार.. निर्मात्यांची मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaalvi, vaalvi 2 , subodh bhave, swapnil joshi, anita date, shivani surve

Vaalvi Movie: वाळवी पाहून डोकं सुन्न झालं, आत्ता वाळवी २ येणार.. निर्मात्यांची मोठी घोषणा

Vaalvi Movie News: सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांचा वाळवी सिनेमा प्रचंड गाजला. वाळवी पाहून अनेकांचं डोकं चक्रावलं. समीक्षकांनी सिनेमाला चांगलंच गौरवलं. प्रेक्षकांनी सुद्धा सिनेमाला अनपेक्षित रित्या उदंड प्रतिसाद दिला. वाळवी ने बॉक्स ऑफिसवर जे यश संपादन केलं त्यामुळे मराठी सिनेमाला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

(vaalvi marathi movie sequel announced by producer its vaalvi 2 coming soon)

वाळवी पाहून अनेकांचं डोकं सुन्न झालं. वाळवी सिनेमाने जे यश मिळवलं त्यामुळे काल निर्मात्यांनी वाळवी सिनेमाचे कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित केली. या सक्सेस पार्टीत सिनेमाचे वाळवी सिनेमाचे निर्माते आणि झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी २ ची घोषणा केली. त्यामुळे सिनेमाच्या टीमने पार्टीत एकच जल्लोष केला

यावरूनच मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत. तिसऱ्या आठवड्यात काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चे भरभरून कौतुक केले.

काल झालेल्या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत सुद्धा सिनेमाचे निर्माते - दिग्दर्शक प्रचंड आनंदात होते. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काल वाळवी चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस होता. त्यामुळे डबल सेलिब्रेशन झालं.

मराठी प्रेक्षक 'वाळवी'ला पसंती देत आहेत. तिसऱ्या आठवड्यात काही थिएटरमध्ये 'वाळवी'चे शोज तिप्पट पटीने वाढवण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षक अशा सर्वांनीच 'वाळवी'चे भरभरून कौतुक केले.

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.