प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये मिळतोय 'वडापाव'; किंमत वाचून पळून जाईल भूक

पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय भारतीय पदार्थ या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये आहेत.
priyanka chopra
priyanka chopra
Updated on

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा Priyanka Chopra सध्या तिच्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने 'सोना' या नावाचं रेस्टॉरंट उघडलं असून तिथल्या भारतीय मेनूची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमुळे अमेरिकावासियांना भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळतेय. पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय भारतीय पदार्थ रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये आहेत. तिच्या या रेस्टॉरंटला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी भेट दिली आहे. निर्माती लोला जेम्सनेही नुकतीच या रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली होती. लोलाने प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये वडापावची Vada pav चव चाखली. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला.

वडापावसोबतच तिने भेळ, चाट आणि इतर खाद्यपदार्थांचीही चव चाखली. 'सोना रेस्टॉरंट हे खरंच अनोखं आहे', असं कॅप्शन देत तिने वडापावचा फोटो पोस्ट केला. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये एक वडापावची किंमत ही १४ युएस डॉलर्स म्हणजेच जवळपास एक हजार रुपये इतकी आहे. मुंबईकरांचा लोकप्रिय वडापाव आता न्यूयॉर्कमध्येही खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय, असं म्हणायला हरकत नाही.

priyanka chopra
Viral : फ्लाइंग वडापाव म्हणजे काय रे भाऊ? मुंबईच्या वडापाववाल्याची भन्नाट ट्रिक

प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरू करताना सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. 'सोना हे नवीन रेस्टॉरंट सुरू होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. न्यूयॉर्कमधील या नवीन रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळणार आहे. यामध्ये हरीनेयक या शेफने नाविन्यपूर्ण मेनू तयार केले आहेत. माझा मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांच्या नेतृत्त्वाशिवाय हा प्रयत्न करता आला नसता. डिझाइनर मेलिसा बॉवर्स आणि उर्वरित टीमचे आभार'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com