प्रसिद्ध कॉमेडिअन वादीवेल बालाजींचं निधन, १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होते दाखल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

प्रसिद्ध कॉमेडिअन वादिवेल बालाजींचं निधन झालं आहे. वादीवेल गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते ज्यानंतर आज गुरुवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

मुंबई- साऊथ सिनेइंडस्ट्रीतून एक वाईट बातमी येत आहे. तमिल इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडिअन वादिवेल बालाजींचं निधन झालं आहे. वादीवेल गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते ज्यानंतर आज गुरुवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या केवळ ४५ व्या वर्षात त्यांचं निधन झाल्याने चाहत्यांसोबत सेलिब्रिटी देखील दुःख व्यक्त करत आहेत. 

हे ही वाचा: रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीने सुशांतला ड्रग देत असल्याचं केलं कबुल, वाचा चौकशीत काय म्हणाला?  

मिडिया रिपोर्ट्सनुसार, वादिवेल यांना हार्ट ऍटॅक आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं जिथे ते काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. वादिवेल यांना हार्ट ऍटॅक आल्यानंतर पॅरालिसीस देखील झाला होता. असं म्हटलं जातंय की आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अशातंच गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच निधन झालं. 

वादिवेल यांनी Adhu Idhu Edhu आणि kalakka Povathu Yaaru सारख्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. तसंच तमिळ सिनेमामध्येही त्यांनी त्यांचं अभिनय कौशल्य दाखवलं होतं. वादिवेल शेवटचे नयनतारांचा हिट सिनेमा Kolamaavu Kokila मध्ये काम करताना दिसून आले होते. असं म्हटलं जातंय की लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती. यामुळे ते अनेक अडचणींमधून जात होते. सोशल मिडियावर चाहते आणि सेलिब्रिटी त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.    

vadivel balaji comedian dies at age 45 in chennai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vadivel balaji comedian dies at age 45 in chennai