Valimai: बॉक्स ऑफिसवर 'वल्लीमई' हसला, 'गंगुबाई' रुसली

बॉलीवूडची बहुचर्चित गंगुबाई काठियावाडी नावाचा (Bollywood News) चित्रपट प्रदर्शित झाला.
Valimai
Valimai

Bollywood Movies: बॉलीवूडची बहुचर्चित गंगुबाई काठियावाडी नावाचा (Bollywood News) चित्रपट प्रदर्शित झाला. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या तुलनेत वलीमईनं बाजी मारली आहे. आठवड्यात या चित्रपटानं चक्क दीडशे कोटींपर्यत झेप घेतली आहे. तर गंगुबाईनं (gangubai kathityawadi) 40 कोटींचा बिझनेस केल्याची माहिती आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या स्पर्धा सुरु असल्याचे दिसून आले आहे. साऊथचा सुपरस्टार अजितच्या वल्लीमईनं ('Valimai' )प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता गंगुबाईकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

अजितच्या वल्लीमईची प्रेक्षक गेल्या दीड वर्षांपासून वाट पाहत होते. मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. जगभरामध्ये वल्लीमईला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. पुढील दोन आठवडे कोणताही तमिळ चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने वल्लीमईला आणखी बिझनेस करण्याची संधी आहे. दुसरीकडे बॉलीवूडमध्ये गंगुबाईची सुरुवात दमदार झाली मात्र अजून म्हणावा असा प्रतिसाद या चित्रपटाला मिळालेला नाही. भन्साळी यांनी नेहमीप्रमाणे याही चित्रपटाच्या वेळी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम प्रेक्षकांवर झालेला नाही.

Valimai
अमृता ताईंचं 'शिवतांडव' Viral; नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव

वल्लीमईच्याबाबत नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेकांना हा चित्रपट येत्या दिवसांत 200 कोटींपर्यत झेप घेईल असे सांगण्यात आले आहे. ग्रॉस कलेक्शनच्या बाबत सांगायचे झाल्यास, वल्लीमई नव्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. अजित यांचा गेल्या वेळी नरकोंडा पारवी हा चित्रपट प्रेक्षकांना भावला होता. तो चित्रपट अमिताभ यांच्या पिंकचा रिमेक होता. वल्लीमई हा चित्रपट एच विनोथ आणि बोनी कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com