Vanita Kharat : वनिता खरातच्या मंगळसुत्राची चर्चा जोरात! काय तर म्हणे, 'काळे मणी...'

सध्या तिच्या लग्नाची, तिनं घेतलेल्या उखाण्याची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्या मंगळसुत्राची जोरदार चर्चा आहे.
Vanita Kharat
Vanita Kharatesakal

Vanita Kharat Wedding : महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसविणारी वनिता ही आता विवाहबद्ध झाली आहे. सध्या तिच्या लग्नाची, तिनं घेतलेल्या उखाण्याची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिच्या मंगळसुत्राची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी तिला दिलेल्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

वनिता ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची चर्चा होती. यासगळ्यात वनिताचे फोटोशुट देखील चर्चेत आले होते. आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. प्री वेडिंग फोटोशुटला चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर तिच्या लग्नाच्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. यासगळ्यात वनिता पुन्हा चर्चेत आली आहे ते तिच्या मंगळसुत्रामुळे.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

वनिताच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सर्व कलाकार उपस्थित होते. त्यांनी त्या लग्नामध्ये खूप धमाल केल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. हास्यजत्रातील पृथ्वीक प्रताप आणि नम्रताचा नवरा योगेश संभेराव यांनी वनिताला लग्नात उचललं होतं. वनिताने एकदम झक्कास पद्धतीने सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली होती.

वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सध्या वनिताच्या मंगळसुत्राची चर्चा होताना दिसते आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील जवळपास सर्वच कलाकारांनी तिच्या या खास सोहळ्यात उपस्थिती दर्शवली होती. वनिताच्या मंगळसुत्राचे नेटकरी कौतूक करत आहेत.

Vanita Kharat
Vanita Kharat Wedding: लॉकडाऊन, लुडो आणि तो.. अशी आहे वनिता खरात - सुमितची लव्हस्टोरी
Vanita Kharat
Vanita Kharat esakal

त्या मंगळसुत्रानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वनिताने मुहूर्तमणी, छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र असे तीन दागिने परिधान केले होते. ज्याची सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

Vanita Kharat
Vanita Kharat Wedding: वनिता खरात उखाणा घेताना सुद्धा 'हास्यजत्रा' विसरली नाही.. बघा हा झक्कास व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com