कोरोनाने अशी केली वरुण धवनची हालत, फोटो पाहून चाहते झाले हैराण

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 15 December 2020

अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक मीम शेअर केलं आहे. या मीममध्ये वरुणने त्याचं लहानपण आणि म्हातारपण असं मीम दाखवलं आहे.

मुंबई- अभिनेता वरुण धवन सध्या क्वारंटाईन आहे. काही दिवसांपूर्वी वरुणला त्याच्या आगामी 'जुग जुग जियो' सिनेमाच्या शूटींंगच्या दरम्यान कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर वरुण त्याच्या घरात क्वारंटाईन आहे. असं असलं तरी वरुण त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर संपर्कात असतो. आणि त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना स्वतःचे अपडेट देत असतो. क्वारंटाईनमध्ये असताना सुद्धा वरुण त्याच्या चाहत्यांसाठी मजेदार पोस्ट शेअर करत असतो. 

हे ही वाचा: 'द कपिल शर्मा शो' मध्ये पुन्हा होणार भारती सिंहची एंट्री? वाचा काय म्हणाली भारती..  

अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक मीम शेअर केलं आहे. या मीममध्ये वरुणने त्याचं लहानपण आणि म्हातारपण असं मीम दाखवलं आहे. पहिल्या फोटोमध्ये वरुण धवन लहान दिसत आहे, दुस-या फोटोमध्ये तो आत्ता जसा आहे तसा दिसत आहे आणि तिस-या फोटोमध्ये मात्र तो म्हातारा दिसून येत आहे. हे फोटो पोस्ट करत वरुणने लिहिलंय, 'आयसोलेशनमधलं आयुष्य, उजवीकडे स्वाईप करा आणि माझं वाढतं वय पाहा.' सोशल मिडियावर वरुणचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वरुणच्या या अतरंगी पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करुन त्याला लवकर बरा होण्यासाठ शुभेच्छा देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणने कोरोनाबाधित झाल्यानंतर स्वतः याविषयीची माहिती सोशल मिडियावरुन दिली होती. हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या चाहत्यांनी तो लवकर यातून बरा व्हावा यासाठी प्रार्थना केल्या आहेत. वरुणने इतरांना देखील कोविड-१९ पासून स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा असं आवाहन केलं होतं.     

varun dhawan shared his old look photo after tested coronavirus positive  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varun dhawan shared his old look photo after tested coronavirus positive