वीणाने शिवसाठी काय केले पाहा..

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

सध्या चर्चेत असलेले  लव्ह-बर्ड्स म्हणजे शिव ठाकरे व वीणा जगताप हाेय. या दाेघांची माेठी चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. शिव ठाकरेचा लवकरच वाढदिवस असून, त्यासाठी वीणाने आधीच त्याला खास सरप्राइज दिलं आहे.

मुंबई : सध्या चर्चेत असलेले  लव्ह-बर्ड्स म्हणजे शिव ठाकरे व वीणा जगताप हाेय. या दाेघांची माेठी चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. शिव ठाकरेचा लवकरच वाढदिवस असून त्यासाठी वीणाने आधीच त्याला खास सरप्राइज दिलं आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठी २ या रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे व वीणा जगताप हे लव्ह-बर्ड्स एकत्र आले. आता शो संपल्यानंतरही शिव-वीणाची प्रेमकहाणी चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही लोकप्रिय जोडी ठरत असून, दोघांच्याही पोस्टवर चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरेचा लवकरच वाढदिवस असून त्यासाठी वीणाने आधीच त्याला खास सरप्राइज दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात वीणाने तिच्या पापण्यांवर शिवचं नाव कोरल्याचं पाहायला मिळालं होतं. आता तिने तिच्या हातावर त्याचं नाव कोरलं आहे. ‘शिव’ नावाचा टॅटू काढताना वीणाने इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडीओ केला होता. ‘राजा-राणीची प्रेमकहाणी आता सुरू झाली आहे,’ असं म्हणत शिवने वीणासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

अनेकांनी शिव-वीणाचं प्रेम म्हणजे केवळ बिग बॉस हा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट वाटला. मात्र शो संपल्यानंतरही हे दोघं सतत एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे.  ”शंभर टक्के प्रेक्षकांनी जे कार्यक्रमामध्ये ऐकलं तेच होणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. माझ्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये झालेली कोणतीही गोष्ट शो जिंकण्यासाठी मी केली नाही,” असं शिवने शो जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. शिव-वीणा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veena Jagtap gave advance birthday surprise to the bigg boss marathi 2 winner shiv thakare