'तारीफां' गाण्यात सोनम, करीनाचा हॉट लूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

या गाण्यात सोनम, करीना, स्वरा भास्कर आणि शिखा तहलसानिया यांच्या अदांनी गाण्याचे टेम्प्रेचर आणखीच वाढविले आहे.

वीरे दी वेडींग या सिनेमाचे 'तारीफां' हे गाणं सध्या युट्युबवर रिलिज करण्यात आले आहे. रॅप गायक बादशाह यानं गायलेलं हे गाणं आहे. या गाण्यात तोही दिसत आहे. बादशाहच्या बॅश सोबत या गाण्यात सोनम कपूर आणि करीना कपूर यांचा बोल्ड पॉट लूक व्युवर्सचे आकडे वाढवतोय. 

या गाण्यात सोनम, करीना, स्वरा भास्कर आणि शिखा तहलसानिया यांच्या अदांनी गाण्याचे टेम्प्रेचर आणखीच वाढविले आहे. गाण्याच्या सुरवातीला सोनम आणि करीना दिसतील. आपल्या अटींवर जगणाऱ्या, स्वतःचे बील स्वतः भरणाऱ्या आणि मुलांवर अवलंबून न राहणाऱ्या मुलींची कहानी या गाण्यातून दिसत आहे. 'तारीफां' हे पार्टी सॉन्ग आहे. 

वीरे दी वेडींग मधून करीना कपूर दोन वर्षानंतर सिनेमात वापसी करत आहे. चार मैत्रीणींची ही कहानी आहे. सिनेमाचा ट्रेलर 19 एप्रिलला लॉन्च केला गेला होता आणि 1 जूनला सिनेमा रिलिज होणार आहे.  


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: veere di weddings tareefan song realese