esakal | ज्येष्ठ अभिनेते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

lalit behl

ज्येष्ठ अभिनेते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक ललित बहल यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांचा मुलगा कानू बहल यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. बहल यांनी 'मुक्ती भवन' आणि 'तितली' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

"शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते आणि त्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. त्यांच्या फुफ्फुसांमध्येही संसर्ग झाला होता", अशी माहिती कानू बहलने दिली. ललित बहल यांनी 'अफसाने' या मालिकेतून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांनी 'तपश', 'आतिश', 'सुनहरी जिल्द' यांसारख्या दूरदर्शनवरील मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं.

हेही वाचा : श्रवण राठोड यांना कुंभमेळ्यातून परतल्यानंतर कोरोनाची लागण

ललित यांनी नाटकांपासून करिअरची सुरुवात केली होती. 'कपूरथला' या नावाने त्यांनी पंजाबमध्ये एक थिएटर ग्रुप तयार केला होता. दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांनी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली होती. तर कंगना राणावतच्या 'जजमेंटल' या चित्रपटातही ते झळकले होते. ललित यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. रणवीर शौरीपासून आदिल हुसैनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.