esakal | चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का; शोले चित्रपटातील सुरमा भुपाली यांचे निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

jagdeep

'शोले' या चित्रपटातील सुरमा भुपालीची व्यक्तिरेखा अजरामर करणारे विनोदी अभिनते जगदीप यांचे कर्करोगाच्या आजाराने अंधेरी येथील राहत्या घरी आज निधन झाले.

चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का; शोले चित्रपटातील सुरमा भुपाली यांचे निधन...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : 'शोले' या चित्रपटातील सुरमा भुपालीची व्यक्तिरेखा अजरामर करणारे विनोदी अभिनते जगदीप यांचे कर्करोगाच्या आजाराने अंधेरी येथील राहत्या घरी आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या मागे अभिनेते जावेद जाफरी आणि नावेद जाफरी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी दतिया, मध्य प्रदेश मध्ये झाला. त्यांचे वडील लाहोरला होते. फाळणीनंतर सर्व काही गेले, त्यानंतर ते मुंबईला आले आणि बालकलाकार म्हणून काम करू लागले. जगदीप यांनी हिंदी सिनेमात अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. जगदीप यांचे खरे नाव सय्यद जवाहर अली जाफरी आहे. जगदीप अभिनयास सुरुवात बालकलाकार म्हणून बी.आर. चोप्रा यांच्या 'अफसाना' या चित्रपटाने केली. 

ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू

बालकलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट 'अब दिल्ली दूर नही', 'मुन्ना व हम पंछी एक डाल के'. त्यानंतर बिमल रॉय यांच्या 'दो बिघा जमीन' या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. 'हम है बेमिसाल', 'अंदाज अपना अपना', 'शहेनशाह', 'मुस्कुराहट', 'सनम बेवफा', 'जमाई राजा', 'निगाहे', 'क्रोध', 'अभिमन्यू' अशा जवळपास चारशे चित्रपटात त्यांनी काम केले. 'शोले' चित्रपटातील सुरमा भुपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी गुरुदत्त, मेहबूब खान अशा कित्येक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले.

'डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही' : अजित पवार

जगदीप यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते स्वतःला सिद्ध करत राहिले. चित्रपट क्षेत्र असे आहे की तुम्हाला सतत स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. त्यांच्या आईचे जेव्हा निधन झाले तेव्हा ते संपूर्णपणे कोसळले होते. परंतु ते सावरले. कारण त्यांची आई ही त्यांच्यासाठी सर्वस्व होती. शोले चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आणि सुरमा भुपाली ही भूमिका लोकप्रिय ठरल्यानंतर त्यांनी सुरमा भुपाली नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.