Satish Kaushik: आज भगवान आपकी... म्हणत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी वाहिली श्रध्द्धांजली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veteran actor mohan joshi shared emotional note on Satish Kaushik death

Satish Kaushik: आज भगवान आपकी... म्हणत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी वाहिली श्रध्द्धांजली..

mohan joshi on satish kaushik death: बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.

सतीश कौशिक आणि अभिनयासोबत दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटात अभिनय तर 20 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. बॉलीवुडमध्ये त्यांची दोस्ती यारी मोठी आहे. त्यांच्या आनंदी आणि गोड स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे.

सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मराठी आणि बॉलीवुड अशा दोन्ही मनोरंजन विश्वात दिग्गज मानले जाणारे अभिनेते मोहन जोशी यांनीही सतीश यांचे फोटो शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(veteran actor mohan joshi shared emotional note on Satish Kaushik death)

मोहन जोशी आणि सतीश कौशिक यांनी एका चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव 'राजाजी'. या चित्रपटात गोविंदा प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाला तूफान लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटातील काही प्रसंगाचे फोटो मोहन जोशी यांनी शेयर केले आहेत.

यावेळी मोहन जोशी यांनी भावनिक शब्दात लिहिलं आहे की, 'होत बुरा लगा आज भगवान आपकी आत्मा की शांति दे..'. मोहन जोशी यांना कौशिक यांच्या निधनाने प्रचंड वाईट वाटलं आहे. म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. तसेच दीवाना मस्ताना, राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आज त्याच्या निधनाने बॉलीवुडमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

टॅग्स :Bollywood News