Shubha Khote: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची एण्ट्री.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veteran actress Shubha Khote grand entry in thipkyanchi rangoli serial on star pravah

Shubha Khote: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची एण्ट्री..

star pravah: स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अश्यातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभा ताई म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही माझी सर्वात आवडती मालिका आहे मी दररोज आवर्जून पहाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र माझ्या आवडीचं आहे. मला जेव्हा या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. या मालिकेत मी दुर्गा आत्याची भूमिका साकारणार आहे. वरवर पहाता कठोर वाटणारी दुर्गा आत्या मनाने खुपच हळवी आहे.

शुभा खोटे या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी केवळ मराठीच नाही तर हिन्दीतरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्या आणि त्यांचे बंधु अभिनेते विजू खोटे या बहीण भावाच्या जोडीने मनोरंजन विश्वावर अधिराज्य केलं. विजू यांच्या निधनानंतर शुभाताई फारशा प्रोजेक्टमध्ये दिसल्या नाहीत. पण बऱ्याच काळाने त्या पुन्हा मालिका विश्वात परतत आहेत. वयाच्या 85 वर्षी त्यांनी मालिकेत एंट्री घेतल्याने सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे.

टॅग्स :Marathi Serialstar pravah