झीनत अमान करणार 'पानिपत'मधून कमबॅक

वृत्तसंस्था
Tuesday, 18 June 2019

झीनत अमान या चित्रपटात होशियारगंजमधील सकिना बेगम यांची भूमिका साकारत आहेत. 

70-80च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या झीनत अमान आता कमबॅक करत आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानीपत' या चित्रपटात सकिना बेगमची भूमिका साकरणार आहे. त्यांची भूमिका लहान असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे झीनत अमान आता पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकतील. ट्रेड अॅनालिसीस तरन आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

या चित्रपटाचे कथानक पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहेत. या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सेनन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. झीनत अमान या चित्रपटात होशियारगंजमधील सकिना बेगम यांची भूमिका साकारत आहेत. याबाबत गोवारीकर म्हणाले की, 'ही भूमिका राजकारणापासून दूर आहे. त्यांची भूमिका ही त्यांच्या राज्यापुरतीच मर्यादित आहे. पुढील आठवड्यापासून त्यांच्या चित्रीकरणाला सुरवात होईल. त्यांचा लूक समोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.'

शूटिंगसाठी कर्जत येथे एनडी स्टुडिओत शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran actress Zeenat Aman plays important role in upcoming Panipat