Navroze Contractor: ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर नवरोज यांचे अपघातात निधन...

Navroze Contractor passes away
Navroze Contractor passes awayEsakal

Navroze Contractor passes away: पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर आणि फोटोग्राफर, लेखक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले नवरोज कॉन्ट्रॅक्टर यांचे 18 जून रोजी एका रस्ते अपघातात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ते आपल्या मित्रांसह स्पोर्ट्स बाईकवरून परतत असताना होसूरजवळ हा अपघात झाला.

Navroze Contractor passes away
Adipurush Row: 'हनुमान देव नव्हतेच ते तर..,' आदिपुरुषच्या वादात लेखक मनोज मुंतशिरच्या विधानानं पुन्हा राडा..

नवरोज यांच्या दुचाकीला दुसर्‍या दुचाकीने धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्याना तामिळनाडूच्या डेंकनीकोट्टई रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नवरोज हे दर वीकेंडला बाईक ट्रिपला जात असतं.

Navroze Contractor passes away
Adipurush Controversy: 'माझं लक्ष तर फक्त...', आदिपुरुषच्या जानकीचा व्हिडिओ व्हायरल..

त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते.

ते एक यशस्वी चित्रपट निर्माते आणि माहितीपट निर्माते होते. नवरोज हे खुप उत्साही बाइकर होते.

त्यांनी भारत परिक्रमा (2005) ही डॉक्युमेंटरी देखील बनवली होती. या माहितीपटात त्यांनी मोटारसायकलवरून 57 दिवसांची भारताची प्रदक्षिणा होती.

त्यांनी मणि कौल दिग्दर्शित दुविधा (1973), 22 june 1897 (1979), लिमिडेट माणुसकी (1995) आणि नचिकेत आणि ज्यू पटवर्धन दिग्दर्शित देवी अहिल्या बाई (2002), पहला अध्याय (1981)

Navroze Contractor passes away
Rakhi Sawant: हिला पहिली बाहेर काढा! राखीचा धिंगाणा, सोसायटीतील लोकं संतापली

विष्णू माथूर, परवेझ मेरवानजी दिग्दर्शित पर्सी (1989), संजीव शाह दिग्दर्शित लव्ह इन द टाईम ऑफ मलेरिया (1991) आणि पट्टाभी रामा रेड्डी दिग्दर्शित देवराकडू (1993) या चित्रपटासाठी त्यांनी काम केले होते.

त्यांनी George Luneau , Pierre Hoffmann आणि Martha Stewart यांसारख्या प्रसिद्ध विदेशी चित्रपट निर्मात्यांसोबतही काम केले होते.

नवरोज हे अहमदाबादमध्ये वाढले. त्यांनी श्रेयस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. एमएस युनिव्हर्सिटी, बडोदा येथून चित्रकला आणि छायाचित्रणात पदवी मिळवली.

नंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीचा अभ्यास केला होता. ते एक उत्तम सिनेमॅटोग्राफर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com