esakal | वेळ विचारण्याच्या बहाण्याने सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार
sakal

बोलून बातमी शोधा

savita malpekar

वेळ विचारण्याच्या बहाण्याने सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार

sakal_logo
By
अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर Savita Malpekar यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्याने पळ काढला. मुंबईतील दादर शिवाजी पार्क Shivaji Park येथे ही घटना घडली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सविता मालपेकर या शिवाजी पार्क येथे फेरी मारून तेथील एका कट्ट्यावर बसल्या होत्या. त्या वेळी आरोपी त्यांना वेळ विचारण्याच्या बहाण्याने जवळ आला आणि त्यांच्या गळ्यातील चेन खेचली. या झटापटीत त्यांचे कपडे फाटले, तसेच त्यांना किरकोळ जखमही झाली. या वेळी सविता मालपेकर यांनी आरडाओरडा केला, मात्र तत्पूर्वी आरोपी मोटारसायकलवरून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळखही पटली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (veteran marathi actress savita malpekars gold chain snatched at dadar shivaji park slv92)

'शिवाजी पार्कात नेहमीच वर्दळ असते. मात्र याठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही. सीसीटीव्ही फक्त मुख्य प्रवेशद्वारजवळ आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, महिला यांचा इथे वावर असतो. त्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे', अशी प्रतिक्रिया सविता मालपेकर यांनी दिली.

सविता मालपेकर यांनी अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'गाढवाचं लग्न' हे त्याचं नाटक खूप गाजलं. 'काकस्पर्श' या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारली. 'कुंकू लावते माहेरचं', 'नटसम्राट', 'मुळशी पॅटर्न', 'शिकारी', 'मी शिवाजी पार्क' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय.

loading image