Sharda Iyengar : ज्येष्ठ पार्श्वगायिका शारदा अय्यंगार यांचे निधन!

Sharda Iyengar
Sharda Iyengar

मुंबई : हिंदीबरोबरच मराठी, गुजराती, पंजाबी, तमीळ, तेलगू अशा विविध भाषांमध्ये गाणी गाणारी ज्येष्ठ पार्श्वगायिका शारदा राजन अय्यंगार यांचे आज येथे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या.

Sharda Iyengar
ST bank Election : चुरस वाढली! सदावर्तेंच्या पॅनलला शिंदे गट, भाजपसह 6 पॅनलचे आव्हान

शारदा अय्यंगार यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३७ रोजी तमिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो सन १९६६ मध्ये आलेल्या सूरज या चित्रपटात. या चित्रपटाला संगीत शंकर-जयकिशन यांचे होते. या चित्रपटातील शारदा अय्यंगार यांनी गायलेले तितली उडी उड जो चली हे गाणे कमालीचे लोकप्रिय ठरले. या गाण्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. विशेष बाब म्हणजे शंकर-जयकिशन यांच्याकडे त्यांनी अनेक गाणी गायली. साठ-सत्तरचे दशक त्यांनी आपल्या आवाजाने चांगलेच गाजविले. 1970 मध्ये आलेल्या 'जहां प्यार मिले' या चित्रपटातील 'बात जरा है आप की' या कॅबरे शैलीतील गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Sharda Iyengar
ST कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

सूरज' चित्रपटातील 'तितली उडी उड जो चली, फूल ने कहा आजा मेरे पास तितली काहे में चली आकाश' हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाणे होते. शारदा यांनी मोहम्मद रफी, आशा भोसले, किशोर कुमार यशुदास, मुकेश, सुमन कल्याणपूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले.

त्यांनी वैजयंतीमाला, सायरा बानू, हेमा मालिनी, शर्मिला टागोर, मुमताज, रेखा, हेलन यांसारख्या अभिनेत्रींसाठी गाणी गायली. शारदा यांनी गायलेली अनेक गाणी हिट ठरली होती. ती मी नव्हेच या मराठी चित्रपटातील लाजू नका मुळी मुलखाची मी भोळी, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट ही मराठी गाणी देखील शारदा यांनी गायलेली आहेत. शारदा या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या ज्यांनी स्वतःचा पॉप अल्बम लॉन्च केला. 1971 मध्ये लाँच झालेल्या त्यांच्या अल्बमचे नाव 'सिझलर्स'असं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com