विकी कौशल पुन्हा दिसणार देशासाठी लढताना!

वृत्तसंस्था
Monday, 4 March 2019

'उधम सिंह' या चित्रपटात विकीला उधम सिंह यांची भूमिका वठविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. विकीनेही याबाबत ट्विट करत आपले मत व्यक्त केले. विकीला शूजित सरकार यांच्यासोबत चित्रपट करायची खूप इच्छा होती. आता त्याचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

मुंबई : अभिनेता विकी कौशल हा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातूनव भाव खाऊन गेला. त्याच्या अभिनयाची सगळीकडेच वाहवा झाली. यंदाच्या वर्षातला उरी हा ब्लॉगबस्टर ठरला आहे. याच्या यशानंतर विकीला अनेत चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तो आणखी एक देशभक्तीपर चित्रपटात झळकेल. शूजित सरकार यांच्या आगामी उधमसिंह यांच्या चित्रपटात विकी झळकेल. 

हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांच्या जीवनावर आधारित असून यात स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात येईल. इंग्रज अधिकारी मायकल अॅडवायरने जालियनवाला बाग येते शांतता सभेत गोळीबाराचे आदेश दिले होते. यात अनेक निष्पाप नागरिक मारले गले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून उधम सिंह यांनी मायकल अॅडवायरची हत्या केली होती.

'उधम सिंह' या चित्रपटात विकीला उधम सिंह यांची भूमिका वठविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. विकीनेही याबाबत ट्विट करत आपले मत व्यक्त केले. विकीला शूजित सरकार यांच्यासोबत चित्रपट करायची खूप इच्छा होती. आता त्याचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

यापूर्वी या चित्रपटात अभिनेता इरफान खान काम करणार होते. पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हा चित्रपट करू शकरणार नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Kaushal acts in Udham singh movie directed by Shoojit Sircar