पाहा, १० वर्षांपूर्वी कसा दिसायचा विकी कौशल, आज बॉलीवूडवर करतोय राज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vicky kaushal 10 year back photo

पाहा, १० वर्षांपूर्वी कसा दिसायचा विकी कौशल, आज बॉलीवूडवर करतोय राज..

Vicky kaushal birthday : अनेक दर्जेदार चित्रपट देऊन बॉलीवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणारा विकी कौशल (vicky kaushal) आज असंख्य चाहत्यांच्या मनावर राज करतोय. आज (१६ मे) विकीचा वाढदिवस असल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही महिन्यांपूर्वीच विकी आणि कतरीना कैफ विवाह बंधनात अडकले. सध्या ते दोघेही बरेच चर्चेत आहेत. पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा हा अभिनेता १० वर्षांपूर्वी कसा होता हे तुम्ही पाहिलंय का..

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त हा खास फोटो आम्ही शेअर करत आहोत. कारण विकीला बॉलीवूड मध्ये येऊन आज दहा वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने विकीने त्याच्या पहिल्या ऑडिशनवेळी काढलेला एक फोटो खास त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत आहोत. या फोटोत विकी कौशल इतका वेगळा दिसतोय की त्याला ओळखणंही कठीण आहे. गेल्यावर्षी त्याने स्वतः हा फोटो शेअर करत बॉलीवूडमध्ये येऊन ९ वर्षे झाल्याची माहिती दिली होती.

vicky kaushal birthday news  10 year back photo

vicky kaushal birthday news 10 year back photo

विकीच्या पहिल्या ऑडिशनचा हा फोटो १० जुलै २०१२ रोजी काढलेला आहे. हा फोटो पाहून कदाचित आपल्याला हा विकी कौशल आहे यावर विश्वास बसणार नाही, पण गेल्या १० वर्षात विकीने स्वतःत बरेच बदल घडवून तो इथपर्यंत पोहोचला आहे. विकीने २०१५ सालात आलेल्या ‘मसान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘संजू’, ‘राजी’, ‘उरी’, ‘मनमर्जिया’, अशा सिनेमांमधून महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकला. तर ‘इमोर्टल ऑफ अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि ‘तख्त’ अशाही महत्वाच्या सिनेमांपुढे त्याचे नाव लागले आहे.