बायको असावी अशी; विकी कौशलने सांगितल्या अपेक्षा | Vicky Kaushal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal

बायको असावी अशी; विकी कौशलने सांगितल्या अपेक्षा

'इन्टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' Into The Wild With Bear Grylls या शोमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विकी कौशलने Vicky Kaushal नुकतीच हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून विकीच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याने 'बायको कशी हवी' याबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. बेअर ग्रिल्सने विकीला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला होता. "तू लग्न करणार आहेस का", असा प्रश्न ग्रिल्सने विचारला असता त्यावर विकी म्हणाला, "नक्कीच, मी लग्न करेन." यावेळी त्याने त्याच्या अपेक्षासुद्धा सांगितल्या.

"एक अशी व्यक्ती, जिच्यासोबतचं तुमच्या भावना जुळू शकतील. जिच्यासोबत तुम्ही सहज वावरू शकाल. तिने मला समजून घ्यावं. आम्ही दोघं एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट स्वभावांचा स्वीकार करून एकमेकांवर प्रेम करू शकू. एकमेकांच्या सहवासाने आम्ही व्यक्ती म्हणून चांगले बनू शकू, अशी जोडीदार मला हवी", असं विकीने सांगितलं.

हेही वाचा: आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून शाहरुखने केली 'या' विश्वासू व्यक्तीची निवड

विकी हा २०१९ पासून अभिनेत्री कतरिना कैफला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनी अद्याप प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. मात्र अनेकांना या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. याशिवाय अभिनेत्री सोनम कपूरच्या भावाने एका चॅट शोमध्ये कतरिना-विकी रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. दिग्दर्शक कबीर खानच्या घरी कतरिना आणि विकीचा रोका पार पडला, असंही वृत्त आहे. दिवाळीत या दोघांचा रोका पार पडल्याचं म्हटलं जात आहे. डिसेंबरमध्ये हे दोघं लग्न करणार असल्याचं समजतंय.

loading image
go to top