विकी-कतरिनाचं नेमकं कसं जुळलं सुत? Vicky Katrina Love Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina Kaif, Vicky Kaushal

विकी-कतरिनाचं नेमकं कसं जुळलं सुत?

बॉलिवूड आणि बॉलिवूडप्रेमींमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल Vicky Kaushal आणि अभिनेत्री कतरिना कैफ Katrina Kaif यांच्या लग्नाची. सुरुवातीला या दोघांच्या अफेअरच्या चर्चा येऊ लागल्या, तेव्हा अनेकांना त्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण ही जोडी ऑनस्क्रीन कुठेच झळकली नव्हती. या दोघांनी कोणत्या पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली नव्हती. इतकंच काय तर लग्नाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा खुद्द विकी कौशल कतरिनाच्या घरी जाताना दिसला, तेव्हा कुठे चाहत्यांना खात्री वाटू लागली. 'खरंच हे दोघं लग्न करणार आहेत', अशा कमेंट्स अनेकांनी विकीच्या व्हायरल व्हिडीओवर केल्या होत्या. त्यामुळे विकी-कतरिनाचं नेमकं सूत जुळलं तरी कसं, हा प्रश्न अजूनही अनेकांना पडला आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी ही बहुचर्चित जोडी सिक्स सेन्स फोर्ट बरवारा याठिकाणी विवाहबद्ध होणार आहे. या दोघांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात कशी झाली, ते पाहुयात.. (Vicky Katrina Wedding)

कुठून झाली सुरुवात?

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये विकी कौशलने अभिनेता आयुषमान खुरानासोबत हजेरी लावली होती. यावेळी करणने विकीला सांगितलं की, "कतरिनाला तुझ्यासोबत काम करायची इच्छा आहे आणि तुमची जोडी ऑनस्क्रीन चांगली दिसेल असं तिला वाटतं." हे ऐकताच विकीला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

विकी-कतरिनाची पहिली मुलाखत-

'टेपकास्ट' या टॉक शोमध्ये विकी-कतरिनाने पहिल्यांदा एकत्र हजेरी लावली. यावेळी दोघांनी प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मोकळेपणाने दिली.

पुरस्कार सोहळ्यात विकी-कतरिनाची केमिस्ट्री-

२०१९ मध्ये विकी कौशलने एका पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं होतं. यावेळी संपूर्ण इंडस्ट्रीसमोर त्याने कतरिनाला स्टेजवर प्रपोज केलं होतं. अर्थात त्यावेळी हे सर्व पब्लिसिटी स्टंट आणि पुरस्कार सोहळ्याचा भाग म्हणून दाखवण्यात आलं होतं. "सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, तर तू सुद्धा विकी कौशलसारखा एखादा चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस", असं तो कतरिनाला मस्करीत म्हणतो. याचवेळी बॅकग्राऊंडमध्ये सलमान खानचं 'मुझसे शादी करोगी' गाणं वाजतं. त्यावर कतरिना हसत त्याला म्हणते, "माझ्यात तेवढी हिंमत नाही."

हेही वाचा: असा असेल विकी-कतरिनाच्या लग्नातील मेन्यू; पाहुण्यांसाठी पदार्थांची चंगळ

कपिल शर्माकडून विकीची मस्करी-

कतरिना-विकी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीत असतानाच २०२० मध्ये विकीने 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. कॉमेडियन कपिल शर्माने यावेळी योग्य संधी साधत विकीसमोर कतरिनाचा उल्लेख केला. "आजकाल तुझ्यासमोरून मांजर गेली तरी तू नाराज होत नाहीस, असं मी ऐकलंय. कारण तुला 'कॅट' पसंत आहे", असं कपिल म्हणतो. त्याच्या या मस्करीवर विकी काहीच उत्तर देत नाही. मात्र यावेळी त्याचा चेहरा पाहण्यासारखा होता.

दिवाळी पार्टीत विकी-कतरिनाची एकत्र एण्ट्री-

एका मित्राने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत विकी-कतरिनाने पहिल्यांदा एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतरही हे दोघं अनेकदा एकत्र पहायला मिळाले, मात्र आजवर विकी-कतरिनाने जाहीरपणे माध्यमांसमोर प्रेमाची कबुली दिली नाही. 'शेरशाह' चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही दोघजण एकत्र आले होते. यादरम्यान कतरिनाच्या घराबाहेर दोन वेळा विकीला पाहिलं गेलं. पापाराझींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कतरिनाच्या इमारतीखाली पार्क केलेल्या विकीच्या कारचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अलिबागमध्ये कतरिनासोबत विकीची न्यू-इअर पार्टी-

२०२१ या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याच्याही चर्चा होत्या. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने अलिबागमधल्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. तर दुसरीकडे कतरिनाने अलिबागमधील फोटो पोस्ट केले होते. कतरिनाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मागील काचेवर विकीचं प्रतिबिंब चाहत्यांनी पाहिलं होतं. तो फोटो व्हायरल होताच, कतरिनाने सोशल मीडियावरून तो फोटो डिलिट केला होता.

अभिनेता हर्षवर्धन कपूरचा खुलासा-

अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ, अभिनेता हर्षवर्धन कपूर याने विकी-कतरिना डेट करत असल्याचं सांगितलं होतं. 'झूम' वाहिनीवरील एका मुलाखतीत हर्षवर्धनला इंडस्ट्रीतील कोणत्या रिलेशनशिपच्या चर्चांना तो खरं मानतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हर्षवर्धन म्हणाला, "विकी आणि कतरिना हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. हे खरं आहे. पण आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल का? माहित नाही."

Web Title: Vicky Kaushal Katrina Kaif Wedding Story Of How The Celebrity Couple Fell In Love

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top