कतरिनासोबतच्या रिलेशनशिपवर विकी म्हणतो, ''प्रेम ही बेस्ट फिलिंग आहे''

वृत्तसंस्था
Friday, 7 February 2020

सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती, विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरची ! पहिल्यांदाच विकीने यावर एक मोठा खुलासा केला आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी घडत असतं. बॉलिवूड हे खूप हॅपनिंग आहे आणि त्यामुळे मनोरंजनापलिकडेही इथे काहीनाकाही होत असतं. दीपिका-रणवीर, अनुष्का-विराट आणि प्रियांका-निक या कपलने लग्न करुन एक नवीनच ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरु केला आहे. मात्र अस अनेक कपल आहेत ज्यांचा छुपछुपके भेटण्याचा सिलसिला सुरु आहे. सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती, विकी कौशल आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरची ! पहिल्यांदाच विकीने यावर एक मोठा खुलासा केला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून विकी आणि कतरीना यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनीही कधीच यावर खुलेपणाने चर्चा केली नाही किंवा अधिकृतपणे त्याची घोषणा केली नाही. या दोघांना एअपरपोर्टवर, पार्टीमध्ये आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान विकीने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोघांमध्ये नक्की कशाप्रकारचं नात आहे यावर तो बोलला. 

विकीने स्वत: सांगितले की तो त्याच्या पर्सनल लाइफविषयी बोलण्यासाठी खूप बिनधास्त आणि ओपन आहे. त्यामध्ये काही खोट बोलण्यावर त्याचा विश्वास नाही. अथवा काही लपवण्यामध्ये त्याला रस नाही. विकी म्हणाला, ''तुम्ही जेव्हा कोणतेही खोटं बोलता तेव्हा त्याला तुम्हाला प्रोटेक्ट करावं लागतं. ते एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी बोलायला लागतात. ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि कालांतराने त्यातून सुटका करणे कठीण होऊन बसते. कतरीनाविषयी बोलयाचं झालं तर, आमच्यामध्ये तसं काहीच नाही.''

विकी आणि कतरीना हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये खूप चांगली फ्रेंडशिप आहे. गेल्या काही काळापासून दिवाळी पार्टी, लग्न, अवॉर्ड शोमधून त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण, अखेर या चर्चांना पूर्मविराम देत विकीने खुलासा केला आहे. विकी कौशलचा 'भूत पार्ट 1 : द हॉन्टेड शिप' हा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. कतरीनाचा 'भारत' हा सिनेमा 2019 मध्ये रिलिज झाला. यावर्षी ती 'सुर्यवंशी' आणि 'इजरा' या सिनेमांतून झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Kaushal opens up on dating rumors with Katrina Kaif