Bhoot Trailer : भूतांच्या गराड्यात अडकलाय विकी! ट्रेलर बघाच

Vicky Kaushal starer Bhoot Hindi movie trailer released today
Vicky Kaushal starer Bhoot Hindi movie trailer released today
Updated on

गेले अनेक दिवस चर्चा असलेला 'भूत : द हॉन्टेड शिप' या विकी कौशलच्या हॉरर चित्रपटाचा भयंकर ट्रेलर आज (ता. 3) रिलीज झाला. ट्रेलरवरूनच धडकी भरवणारा 'भूत' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करणार असं दिसतंय. एक बंद जहाजावर संशोधन करण्यासाठी गेलेल्या विकीला किती भूतांचा समाना करावा लागतो, हे या ट्रेलरमधून दिसतंय. तीन चित्रपटांची सिरीज असलेल्या 'भूत'ने पहिल्याच भागात भीतीची परिसीमा गाठली आहे.

 पृथ्वी (विकी कौशल) हा सर्वेक्षण अधिकारी जुहू बीचवर आलेल्या 'सी बर्ड' जहाजावर संशोधन करायला जातो. ही शीप भरकटत जुहू बीचवर आलेली असते आणि त्यात एकही माणूस नसतो. यातील माणसे कुठे गेली, आतमध्ये नक्की काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पृथ्वी तिथे जातो आणि मग त्याला आलेल्या भयंकर अनुभवांचा तो कसा सामना करतो हे या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे. त्याच्या मागावर एक भूत आहे, जे या शूीपमध्ये सतत त्याच्या पाठीमागे लागलेलं असतं, त्याला त्रास देतं. ते भूत नक्की कोण असतं? त्याच्या कुटूंबाचा याच्याशी काही संबंध असतो का, असे अनेक अनुत्तरीत प्रश्न या ट्रेलरमध्ये आहेत. 

ट्रेलरवरून तरी हा चित्रपट भयंकर वाटतोय. विकी कौशलनेही गोंळलेल्या अधिकाऱ्याची भूमिका उत्तम प्रकारे साकारली. ऊरी, मसान या चित्रपटातून विकीने आपल्या दर्जेदार अभिनयाची झलक दाखवलीच आहे, आता 'भूत'मध्ये तो काय करिष्मा दाखवतो हे बघण्यासारखे असेल. सध्या त्याच्या सरदार उधमसिंह या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू आहे. त्यामुळे एक से एक चित्रपट देण्यासाठी विकी सज्ज आहे.

भूतचं दिग्दर्शन भानु प्रताप सिंह यांनी केलं असून धर्मा प्रॉडक्शन्स, करण जोहर व शशांक खेतान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 21 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com