विकी कौशलच्या बहुचर्चित 'सॅम बहादुर' साठी 365 दिवसांची प्रतिक्षा ; जाणून घ्या रिलीज डेट sam bahadur release date announced | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal starrer sam bahadur release date announced

Vicky Kaushal: विकी कौशलच्या बहुचर्चित 'सॅम बहादुर' साठी 365 दिवसांची प्रतिक्षा ; जाणून घ्या रिलीज डेट

Vicky Kaushal: रॉनी स्क्रूवाला निर्मित, मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित 'सॅम बहादूर'या चित्रपटाची रिलीज डेट अखेरीस निर्मात्यांनी जाहीर केली आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून, हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमागृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. तसेच, या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लूची व्यक्तिरेखा सान्या मल्होत्रा साकारणार असून, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेखला पाहायला मिळेल. निर्मात्यांनी पुढील वर्षी रिलीज होण्याच्या अगदी एक वर्ष अगोदर तारीख जाहीर केली असून, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.(Vicky Kaushal starrer sam bahadur release date announced)

हेही वाचा: Bollywood: 'Safe Sex' वर भाष्य करणार रकुल प्रीत सिंग, 'छतरीवाली' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष..

व्हिडिओमध्ये सॅम बहादूरचा मार्ग मोकळा करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची बटालियन दाखवण्यात आली आहे. तसेच, चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सॅमच्या व्यक्तिरेखेशी असलेले विकीच्या अनोख्या साम्यामुळे या चित्रपटाची चर्चा सर्वत्र आहे. अशातच, जेव्हापासून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

सॅम माणेकशॉ यांच्या लष्करी कारकिर्दीत चार दशके आणि पाच युद्धे यांचा समावेश आहे. तसेच, फील्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.

मेघना गुलजार दिग्दर्शित, विकी कौशल, सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख अभिनीत आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित, हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.