हॉट विकी कौशल होणार 'फॅट'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बॉलिवूडचा हॅंडसम बॉय विकी कौशलही त्याच्या आगामी सिनेमासाठी एक प्रयोग करणार आहे. जाणून घ्य़ा विकी कौशल नक्की कोणत्या सिनेमासाठी हे करणार आहे. 

मुंबई : दिवसेंदिवस सिनेमांची स्पर्धा वाढत आहे. सिनेमांचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाह काहीतरी वेगळं पाहायचं असतं. याच प्रयत्नातून सिनेमांचे निर्देशकही वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये कलाकार कसे मागे राहणार त्यामुळे तेही आपल्या भूमिकांप्रमाणे स्वत: मध्येही बदल करतात. बॉलिवूडचा हॅंडसम बॉय विकी कौशलही त्याच्या आगामी सिनेमासाठी एक प्रयोग करणार आहे. जाणून घ्य़ा विकी कौशल नक्की कोणत्या सिनेमासाठी हे करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wish you all a Diwali full of love, light and positivity! 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

बॉलिवूडचा हिरो विकी कौशल हा एक टॅलेंटेड अभिनेता आहे. आजवर त्याने साकारलेल्या भूमिका या वेगळ्या धाटणीच्या, चौकटी बाहेरच्या अशाच होत्या. सुपरहिट सिनेमे देत त्याने बी-टाऊनमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. मसान, राझी, लस्ट स्टोरीज, संजू, उरी या सिनेंमातून त्याने अभिनेयाची वेगळी छाप सोडली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@rohanshrestha #whitetseries

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

राजस्थान पत्रिकाने दिलेल्या माहितीनुसार 'उरी' सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी कौशल पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे. 'अश्वत्थामा' या त्यांच्या आगामी सिनेमातून विकी दिसणार आहे. विकी यामध्ये गुरु द्रोणाचार्य यांच्या मुलाचा म्हणजेच अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@hellomagindia @shotbynuno

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

या भूमिकेसाठी विकी खास मेहनत घेताना दिसतो आहे. चार महिने तो ट्रेनिंगसाठी देणार आहे. एवढचं नाही तर, 'जपानी मार्शल' आणि 'इज्राइल मार्शल' चं तो प्रशिक्षण घेणार आहे. याच सिनेमासाठी तो वजन वाढवत आहे. जवळपास 115 किलोपर्यंत तो वजन वाढवणाकर आहे. याआधी 'उरी' या सिनेमासाठी त्याने वजन वाढवलं होतं. हा सिनेमा हिंदीसह इंग्लिश, तमिळ, तेलुगू या भाषांमध्येही रिलिज होणार आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी 2021 ला रिलिज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

... @khamkhaphotoartist x @amandeepkaur87

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

नेहमीच काहीतरी वेगळं करणारा विकी पहिल्यांदाच हॉंटेड सिनेमा करणार आहे. 'भूत पार्ट 1- दि हॉंटेड शिप' हा त्याचा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

दिल तो बच्चा है जी... 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Kaushal to undergo physical transformation for his next movie